Latest

Ankita wedding Nihar : शिवसेना प्रमुखांच्या घरात होणार हर्षवर्धन पाटील यांची सोयरिक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आता ठाकरे घराण्याच्या सून होणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी डिसेंबर महिन्याच्या २८ तारखेला हा विवाह (Ankita wedding Nihar) होणार आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हा शानदार विवाह सोहळा पार पडणार आहे.

अंकिता पाटील पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत, तर निहार यांनी 'एलएलएम'पर्यंचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. अंकिता यांचं शिक्षण हे लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स आणि हाॅर्वर्डमध्येबी शिक्षण घेतलेले आहे. त्याचबरोबर त्या इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या सदस्याही आहेत. त्यांच्या आजी रत्नप्रभादेवी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर त्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत. इंदापूर तालुक्याच्या राजकारणात त्या सक्रीय आहेत.

निहार आणि अंकिता यांच्या लग्नाची (Ankita wedding Nihar) मागील काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र, आज ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. या लग्नानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले.हर्षवर्धन पाटील म्हणाले की, २८ डिसेंबर रोजी मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे त्यांनी माध्यमांनी दिली. तर, पाटील यांच्या मूळ गावी बावडा येथे गावकऱ्यांसाठी १७ डिसेंबर रोजी भोजन ठेवलेले आहे.

निहार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहे. त्यांच्या वडिलांचे म्हणजेच बिंधूमाधव यांचे १९९६ रोजी अपघाती निधन झाले होते. उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका असून राज ठाकरे हे त्यांची चुलत काका आहे. या लग्नामुळे ठाकरे आणि पाटील ही राजकीय घराणे एकत्र येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रात सध्या अनेक राजकीय कुटुंबात विवाहाची धामधूम पार पडली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरात लग्नकार्ये पार पडली. आता हर्षवर्धन पाटील यांच्या घरात लग्नाची धावपळ सुरू आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT