Bihar : बिहारमध्ये स्वॅब सॅम्पल कलेक्शन यादीत नरेंद्र मोदी, अमित शहा यांची नावं
बिहार, पुढारी ऑनलाईन : चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी, बाॅलिवुड सेलिब्रिटी प्रियांका चौप्रा आणि अभिनेता अक्षय कुमार कोरोना चाचण्या बिहारमधील (Bihar) अरवाल जिल्ह्यामध्ये करण्यात आल्या आहेत, असं आरोग्य विभागाच्या कोरोना तपासणी यादीत आढळून आले आहे.
बिहारमधील (Bihar) अरवाल जिल्ह्यात या चाचण्या खोट्या असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात खोटी नावं नोंदवून कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्याचं दाखविण्यात आलं आहे. या नावांच्या यादीत अनेक दिग्गजांची नाव दाखविण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चौप्रा आणि अभिनेता अक्षय कुमार यांची आरटी-पीसीआर चाचण्यांच्या यादीत नावं नोंदविण्यात आलं आहे.
अरवाल जिल्ह्यातील कारपी ब्लाॅकमध्ये २७ ऑक्टोबरला या चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध व्यक्तींच्या नावासमोर वेगवेगळ्या गावांचे पत्ते लिहिण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव या यादीत तीन वेळा आलं आहे. त्यांच्या नावापुढे बिहारचे माजी पक्षप्रमुख राम जतन सिन्हा यांचा पत्ता लिहिला आहे.
प्रियंका चोप्राचं नाव सहावेळा, अक्षय कुमारचं नाव चारवेळा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं नाव दोन वेळा आहे. अहवालानुसार या व्यक्तींनी २७ ऑक्टोबरला स्वॅब सॅम्पल दिलं आहे. २८ ऑक्टोबरला आरटीपीसीआर चाचण्या कलेक्ट करण्यात आल्या आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?