Nargis Fakhri 
Latest

HBD Nargis Fakhri : नरगिसच्या ‘त्या’ ७ गोष्टी, कदाचित तुम्हाला माहिती नसतील

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नरगिस फाखरी आज (२० ऑक्टोबर) आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अमेरिकन मॉडल आणि बॉलीवूड अभिनेत्री नरगिसने (HBD Nargis Fakhri) आपला पहिला चित्रपट 'रॉकस्टार' मधून एन्ट्री केली होती. तिचे सौंदर्य आणि अभिनयाने तिने आपलं कौशल्य तर दाखवलं. पण, म्हणावं तसं तिचं करिअर बहरलं नाही. म्हणूनचं हिंदी चित्रपटसृष्टीविषयी तिची उदासीनता मुलाखतीतून दिसून आली होती. तिच्या वाढदिवसानिमित्त या गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसाव्यात. (HBD Nargis Fakhri)

नरगिस स्वत:ला ग्लोबल सिटिजन मानते. तिला जगभरातील पसरलेल्या अनेक देशांच्या सीमा मान्य नाहीत. प्रेम हेच तिच्यासाठी धर्म आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर नरगिसने ही गोष्ट स्वत: लिहिली आहे.

नरगिसला निसर्ग खूप आवडतो. गार्डनिंग तिचा आवडता छंद आहे. नरगिस आपल्या जीवनाची तुलना गार्डनशी करते. तिच्या माहितीनुसार, ज्या प्रकारे आपण बिया, रोपे लावतो आणि प्रेमाने लक्ष देतो. त्याप्रकारे आपण, आपल्या आयुष्याकडे लक्ष दिलं पाहिजेय
नरगिस आपला फिटनेस मेंटेन ठेवत असली तरी तिला वेगवेगळे पदार्थ चाखण्याची आवड आहे. तिने मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की, तिला चांगलं जेवण खूप आवडतं. आणि ते शेअर करणं अजिबात आवडत नाही.

नरगिसला फिट राहणं खूप आवडतं. जेव्हा तिचं वजन थोडं तरी वाढलेलं दिसलं तरी ती वर्कआऊट करणं सुरू करते. ती बॉक्सिंगसोबत अन्य व्यायाम करून पुन्हा आपले वजन नियंत्रणात आणते.

तुम्ही नरगिसच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटला पाहिलं तर एक कॉमन गोष्ट पाहायला मिळते, ते म्हणजे फोटो. ट्रॅव्हल फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, नरगिसला फिरायला खूप आवडत. तिला ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. फिटनेस, खाणं आणि फिरण्यासोबत नरगिसला सर्वाधिक जी गोष्ट आवडते, ते म्हणजे वाचन करणे. कितीही मेहनत, बिझी टाईम असो, ती पुस्तके वाचण्यासाठी वेळ काढतेच.

आणखी एक खास गोष्ट म्हणजे नरगिस पजामा टीशर्ट मध्ये किंवा कॉफी पिताना दिसते. ती विना मेकअप फिरताना दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT