पुढारी ऑनलाईन डेस्क : पती आणि पत्नीमध्ये बऱ्याचवेळा वादाचे प्रसंग घडत असतात. यात भांडण टोकाला गेल्यानंतर मात्र एकमेकांवर प्राणघातक हल्ल्याचे प्रसंग घडतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीचे हात-पाय बांधून तिला खड्ड्यात पुरल्याची घटना समोर आली आहे. मात्र त्या महिलेचे नशीब बलवत्तर म्हणून ती बचावली. तिने मोठ्या हुशारीने आपले नाक मातीतून थोडे बाहेर ठेवले होते. जेणेकरून तिला श्वास घेता यावा. यामुळे तिचे प्राण तर वाचलेच शिवाय नवऱ्यालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात ती यशस्वी झाली.
ही घटना अमेरिकेच्या वॉशिंग्टन मधील आहे. (४२ वर्षीय) यांग सूक एन ही घरात एकटी होती. त्याचवेळी तिचा (५३ वर्षीय) पती चाय क्योंग घरात आला. या पती-पत्नी मध्ये अनेक दिवसांपासून संपतीवरून वाद सुरू होता. दोघानींही घटस्फोटासाठी अर्ज केला होता. रोज उडणाऱ्या खटक्यांमुळे ते दोघे वेगळे राहत होते.
यांगने आरोप केला आहे की, १६ ऑक्टोबर या दिवशी तिच्या पतीने तिचे अपहरण केले. त्याने माझ्यावर चाकूने हल्ला केला. मला जखमी करून त्याने माझे हात-पाय दोरीने बांधले आणि मला गाडीच्या डिक्कीत घातले. यानंतर त्याने दूर जंगलात नेऊन त्याने एका खड्ड्यात मला ढकलून दिले आणि माझ्यावर माती टाकली. या दरम्यान मी Apple Watch वरून तिच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना एक अलर्ट मॅसेज सेंड केल्याची माहिती पाेलिसांना दिली.
एकीकडे यांग खड्ड्यात पडली होती, तर दुसरीकडे पोलिस तिचा शोध घेत होते. मात्र ज्या खड्ड्यात यांगला टाकून तिच्यावर माती टाकण्यात आली होती. त्याचवेळी यांगने थोडी हुशारी दाखवत श्वास घेण्यासाठी आपले नाक मातीतून आधीच बाहेर काढले होते. यामुळे तिला श्वास घेणे सोपे झाले. यानंतर तिने प्रयत्न करत हळूहळू स्वत:लाही त्या मातीतून बाहेर काढले. अनेक तास जंगलात भटकल्यानंतर तिला एक घर दिसले. तीथे पोहोचल्यावर तीने पोलिसांशी संपर्क केला आणि या विषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिला रूग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांनी संशयीत आरोपी पतीचा शोध सुरू केला.
घटनेच्या दूसऱ्या दिवशी १७ ऑक्टोबर रोजी यांगच्या पतीला अटक करण्यात आली. हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करत त्याची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयात त्याच्या शिक्षेची सुनावणी अद्याप झालेली नाही.
हेही वाचा :