नोटेवर गांधीजींचा फोटो नको; ‘या’ नेत्याचा फोटो हवा – हिंदू महासभेची मागणी Hindu body seeks Netajis face on currency notes | पुढारी

नोटेवर गांधीजींचा फोटो नको; 'या' नेत्याचा फोटो हवा - हिंदू महासभेची मागणी Hindu body seeks Netajis face on currency notes

नोटेवर गांधीजींचा फोटो नको; 'या' नेत्याचा फोटो हवा - हिंदू महासभेची मागणी

पुढारी ऑनलाईन : अखिल भारतीय हिंदू महासभेने सर्व चलनी नोटेवरून महात्मा गांधीजींचा फोटो काढून त्या ऐवजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाला दिलेले योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या कार्याशी तुलना करता कमी नाही, असेही या संघटनेने म्हटले आहे. (Hindu body now seeks Netajis face on currency notes)

नवरात्रीच्या काळात या संघटनेने कोलकोता येथे महात्मा गांधीजींचा पुतळा महिषासुराच्या रूपात दाखवल्याने मोठा वाद झाला होता. आता या संघटनेने नवी मागणी करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रचुड गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना हिंदूंचे हित जपण्यात अपयश आले आहे. त्यामुळे हिंदू महासभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.” गांधींजीचा पुतळा महिषासुरू रूपात दाखवण्याचा संघटनेचा कोणताही हेतू नव्हता, हा प्रकार अनावधानाने घडला होता, असेही ते म्हणाले.

हिंदू महासभेच्या मागणीवर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. तर भाजपचे प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी अशा संघटनांच्या मागणीला भाजप महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा

Back to top button