Latest

Guhagar Corona : गुहागरमध्ये गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी पॉझिटिव्ह

backup backup

गिमवी (गुहागर ) ; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून दाखल झालेल्या आणि ज्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे दिसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. २५६१ रुग्णांपैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण (guhagar corona) गुहागर तालुक्यातील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गतवर्षी सगळ्यांची सरसकट कोरोना चाचणी करण्यात आली होती.

मात्र त्यामुळे यंत्रणेवर मोठा ताण आला होता. मात्र यंदा जिल्हा प्रशासनाने त्यात बदल केला असून ज्यांना कोरोना सदृश लक्षणे दिसून येतात त्यांचीच आरटीपीसीआर किंवा अँटी जेन चाचणी करणार येत आहे. (guhagar corona)

त्यातील पहिला अहवाल आज जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये आज शनिवारी चाचणी केलेल्या 2561 जणांच्या अहवाल प्राप्त झाला असून त्यातील 12 जणांचा अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण गुहागर तालुक्यातील आहेत.

यातील 11 जणांना गृह विलगिकरण मध्ये तर एकाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

अद्याप 9405 जणांचे अहवाल प्रगतीपथावर आहेत असे डॉ आठल्ये यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT