Latest

लग्‍नाच्या वरातीवर पुष्‍पाची नशा…; श्रीवल्‍ली गाण्यावर चप्पल ओढण्यासाठी उडाली झुंबड (Video)

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन असं वाटतंय की, लोकांच्या डोक्‍यातून अल्‍लू अर्जुनच्या पुष्‍पा (Pushpa) सिनेमाचं खुळ काही अजुनही उतरलेलं नाही. हा चित्रपट जेंव्हा प्रदर्शित झाला तेंव्हापासून या चित्रपटातील गाणी, डायलॉग्‍सनी लोकांच्यावर चांगलीच जादू केली आहे. प्रत्‍येकजण या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्‍सवर रिल्‍स बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. लग्‍न असो की, पार्टी सर्वत्र लोक श्रीवल्‍लीच्या गाण्यावर (Srivalli Song) डान्स करताना दिसत आहेत. त्‍यातच आता सोशल मीडियावर एक अफलातून व्हिडिओ (Funny Video) व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्‍हाला पोट धरून हसावेच लागेल.

हा व्हिडिओ एका लग्‍नाच्या वरातीचा आहे. ज्‍यामध्ये वरातीतील सर्व लोकं श्रीवल्‍ली गाण्यावर नाचत आहेत. हा डान्स करताना प्रत्‍येकाची अवस्‍था अतीशय वाईट झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, अनेक लोकं श्रीवल्‍ली गाण्यावर नाचताना दिसत आहेत. रस्‍त्‍यावर इतक्‍या मोठ्या प्रमाणात लोक एकाच गाण्यावर थिरकताना दिसत असल्‍याने हा लग्‍नाचा व्हिडिओ असावा असे दिसून येते. ही सर्व लोक अल्‍लू अर्जुनच्या डान्स स्‍टेप कॉपी करताना दिसून येत आहेत. यातील काही लोक फ्लॉवर समझे क्‍या या डायलॉगवरही ॲक्‍शन करताना दिसत आहेत.

आतापर्यंत ज्‍यांनी-ज्‍यांनी हा व्हिडिओ पाहिला त्‍यांना आपले हसू आवरता आलेले नाही. कारण लोकांवर पुष्‍पाचा चांगलाच फिवर चढला आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी गमतीदार असून, लोक पुन्हा-पुन्हा हा व्हिडिओ पाहत आहेत. व्हिडिओ पाहिल्‍यानंतर प्रत्‍येकाची हिच प्रतिक्रिया आहे की, लोकांची डान्स करताना वाईट अवस्‍था झाली आहे. असे असले तरीही हे लोक नाचताना थकलेले नाहीत हे विशेष…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT