बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकाची १ इंच भूमी, एक थेंब पाणी कोणाला देणार नाही. अशी माहिती कर्नाटकाचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. गोविंद कारजोळ शनिवारी शासकीय भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कारजोळ म्हणाले, पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना कळसा-भांडुरा प्रकल्प ही बाब सध्या न्यायालयीन लढाईत आहे. यामध्ये आम्ही नक्की बाजी मारू. बेळगावात भाजपला साथ देत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून दिले आहेत. पराभूत झालेल्या उमेदवाराने उमेदवाराने व्हीव्हीपॅट मशीन जोडली नसल्याची बाब हास्यास्पद आहे.
बेळगाव हे कर्नाटकाचे आहे. महाजन अहवाल अंतिम असेल, अशी माहिती पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. मनपा मध्ये महापौर मराठी करणार की कन्नड असा बोचरा सवाल पत्रकारांनी विचारला असता यावर त्यांनी मौन धारण केले.