Latest

Google च्या एका वर्षात २८० चुका शोधून स्टेशनरीवाल्याचा मुलगा झाला ‘करोडपती’ !

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : जगभरात गुगल सर्च इंजिनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक गोष्टी सर्च करण्यासाठी माध्यम म्हणून Google कडे पाहिले जाते. पण याच Google च्या सर्च इंजिनवर २०२१ मध्ये चक्क २८० चुका आढळल्या आहेत. याच २०२१ मधील चुका शोधून इंदूर येथील अमन पांडे हा चक्क करोडपती बनला आहे.

अमन पांडे हा इंदूर येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील रहिवाशी आहे. त्याचे वडील इंदूरमध्ये स्टेशनरीचे दुकान चालवतात. अमनला २०२१ या एका वर्षात गुगलच्या इतक्या चुका सापडल्या की, त्याने त्या शोधून गुगलला सांगितले. याची नोंद घेत, Google ने अमनला ६५ कोटी रूपयांचे बक्षीस देत करोडपती बनवले.

अमन हा मूळचा झारखंडचा आहे. त्याचे हावीपर्यंतचे शिक्षण डीएव्ही स्कूल, पत्रातू येथून झाले. बोकारो येथील चिनामाया शाळेतून बारावीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांने भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले. अमनने भोपाळ एनआयटी मधून बी. टेक केलं आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे काम करत आहे. गुगलकडून मिळालेल्या बक्षिसाने त्याच्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली गेली आहे. अमन याने आपल्या मित्राच्या मदतीने २०२१ मध्ये Bugsmirror ही कंपनीही त्याने स्थापन केली आहे.

अमनने शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी स्वीकारली नाही. त्याने आपले काम सुरू केले. एक स्टार्टअप म्हणून, अमनने त्याच्या सहकाऱ्यांसोबत बग्समिरर कंपनी सुरु केली. इंदूरमधून जानेवारी २०२१ मध्ये काम सुरू केले. सध्या इंदूरमध्ये त्यांचे एक छोटेसे कार्यालय आहे. Bugsmirror या कंपनीच्या टीमचा भाग असलेले उदय शंकर यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले की, आमची कंपनी जानेवारी २०२१ मध्ये सुरू झाली आहे. सध्या व्यवस्थापन संघ चार लोकांचा आहे. अमन पांडे म्हणाला की, सध्या आमच्या कंपनीत एकूण १५ कर्मचारी आहेत. मी रतन टाटा यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे.

हे ही वाचलं का 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT