डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य संमेलनाचे सन्मानचिन्ह भेट, यावेळी काय म्हणाले नारळीकर?

डॉ. जयंत नारळीकर यांना साहित्य संमेलनाचे सन्मानचिन्ह भेट, यावेळी काय म्हणाले नारळीकर?

नाशिक पुढारी वृत्तसेवा : येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, मुख्य समन्वयक समीर भुजबळ, संमेलनाचे कार्यवाह नाटककार भगवान हिरे, सहकार्यवाह किरण समेळ, स्वागत मंडळाचे सभासद शेफाली भुजबळ, चित्रकार राजेश सावंत, समाधान जेजुरकर यांनी पुण्यात डॉ. जयंत नारळीकर यांची भेट घेऊन संमेलनाचे सन्मानचिन्ह भेट दिले.

संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. नारळीकर यांनी सन्मान चिन्हावर विज्ञान अवतरल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. आपण हे चिन्ह स्वत:च्या निवासस्थानी न ठेवता आयुका मध्ये ठेवणार आहोत कारण त्यानिमित्ताने तेथे येणारे शास्त्रज्ञ विज्ञान प्रेमी यांना साहित्य व विज्ञान यांचा अनुबंध लक्षात येईल. यावेळी चित्रकार राजेश सावंत यांनी काढलेल्या संमेलनाध्यक्षाच्या व्यक्तीचित्राचे विशेष कौतुक केले. संमेलनातील विषयात वैविध्य होते. विविध विषयाचे तज्ञ संमेलनात उपस्थित होते. नव माध्यमांचा संयोजकांनी चांगला उपयोग केल्याने संमेलन लोकांपर्यंत पोहचले असे ही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकचे साहित्य संमेलन लक्षवेधी झाले. ते मी दृकमाध्यमाव्दारे पहिले, या संमेलनाला येण्यासाठी मी सर्व प्रकारची तयारी केली होती, संमेलानाआधी माझे अध्यक्षीय भाषण संयोजन समितीकडे पाठविले होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्य आणि वातावरणातील बदलामुळे संमेलनाला उपस्थित राहता आले नाही, याबद्दल साहित्य रसिकांप्रति दिलगिरी व्यक्त करतो अश्या शब्दात आपल्या भावना ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news