Latest

Gold Ring : तीन हजार वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या अंगठीचा शोध

Arun Patil

कैरो : इजिप्तमधील पुरातत्त्व संशोधकांनी 3,300 वर्षांपेक्षाही अधिक जुन्या अशा दफनस्थळी सोन्याच्या (Gold Ring) काही. दागिन्यांचा शोध लावला आहे. त्यामध्ये प्राचीन इजिप्शियन देवतेची प्रतिमा कोरलेल्या एका अंगठीचा समावेश आहे. ही मनोरंजनाची देवता मानली जाते तसेच ती प्रसूतीच्या वेळी महिलांचे संरक्षणही करते, असे मानले जात होते.

कैरोपासून 300 किलोमीटरवर असलेल्या सध्याच्या अमार्नाजवळ प्राचीन काळातील (Gold Ring) खेतातेन नावाचे शहर होते. याच ठिकाणी हे दफनस्थळ शोधण्यात आले आहे. हे शहर इसवी सनपूर्व 1353 ते इसवी सनपूर्व 1336 या काळात राज्य केलेल्या फेरो अखेनातेन याने वसवले होते. त्याच्या काळातच इजिप्तमध्ये सूर्य उपासना वाढली होती. या सूर्यदेवतेला तिथे 'अतेन' असे नाव होते. त्यानेच इजिप्तची राजधानी सध्याच्या लक्सरजवळील थेबेस येथून वाळवंटात नव्याने वसवलेल्या अखेतातेन शहरात हलवली.

मात्र, त्याच्या धार्मिक सुधारणा त्याचा मुलगा तुतानखामेन याने पुढे चालवल्या नाहीत आणि नवे शहरही अखेनातेनच्या मृत्यूनंतर ओसाड पडले. आता शोधण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये (Gold Ring) तीन अंगठ्यांचा समावेश आहे. त्यापैकी एका अंगठीवर 'बेस' नावाच्या देवतेची प्रतिमा कोरलेली आहे. ही संगीत व मनोरंजनाशी संबंधित देवता होती. तसेच ती स्त्रियांचे प्रसूतीच्या वेळी रक्षण करणारीही देवता असल्याचे मानले जात होते, असे ब्रिटिश म्युझियममधील इजिप्टोलॉजिस्ट जॉर्ज हर्ट यांनी सांगितले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT