पुढारी ऑनलाईन डेस्क : Gold Price Today : लग्नसराई हंगाम सुरु असतानाच सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळ्यामागे २५२ रुपयांनी स्वस्त होऊन ४७,८४९ (प्रति १० ग्रॅम) रुपयांवर आला. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४४ हजारांच्या खाली आला. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,८४९ रुपयांवर खुला झाला होता. काल मंगळवारी सोन्याचा भाव ४८,१०१ रुपयांवर होता. त्यात आज बुधवारी घसरण झाली.
इंडियन बुलियन ज्वेलर्स आणि असोशिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, बुधवारी (दि.१ डिसेंबर) २३ कॅरेट सोने ४७,६५७ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,८३० रुपये, १८ कॅरेट सोने ३५,८८७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २७,९९२ रुपये होता. तर चांदीचा भाव प्रति किलो ६२,२१८ रुपये होता. (हे बुधवार दि. १ डिसेंबर दुपारपर्यंतचे अपडेटेड दर आहेत)
लग्नसराईत सोन्याला मागणी अधिक असते. याच काळात सोन्याचे दर कमी होऊ लागले आहेत. सोने खरेदी करण्यांसाठी सुवर्णसंधी आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.