गोवा

गोवा : तामिळनाडूच्या पर्यटकाचे अपहरण; दोघांना अटक

अनुराधा कोरवी

हणजूण : पुढारी वृत्तसेवा : गोव्यात आलेल्या पर्यटकाचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी इम्रान कुरेशी (28, रा. मुड्डावाडो, कळंगुट मूळ रा. उत्तर प्रदेश ) व मार्शल कार्दोज (31, रा. मुड्डावाडो, कळंगुट) यांच्या दोघांच्या मुसक्या आवळल्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी अपहरण केलेल्या पर्यटकाची सुटका केली.

तामिळनाडू येथील दोघे पर्यटक मित्र 19 रोजी पहाटे 4.25 वाजण्याच्या सुमारास भाड्याच्या दुचाकीने कळंगुट येथून हणजूण येथे जात होते. यावेळी दोघा संशयितांनी त्यांचा हणजूणपर्यंत पाठलाग करून त्यांना अडवले. त्यांना मारण्याची धमकी देऊन मनोज अशोकन ( रा. तामिळनाडू) याला आपल्या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले.

त्याच्या मित्राने अपहरण झाल्याची तक्रार कळंगुट पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून तसेच मोबाईल लोकेशनच्या आधारे अवघ्या काही तासात रोजेस गेस्ट हाऊस, मुड्डावाडो, कळंगुट येथून मनोज याची सुटका केली. दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. कळंगुट पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण नाईक, हवालदार विद्यानंद आमोणकर, कर्मचारी मनोज नाईक, गौरव चोडणकर, पीटर फर्नांडिस, गणपत तिळोजी व आकाश नाईक यांनी ही कारवाई केली.

वाचा: 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT