गोविंदा आला रे: दापोलीत तरुणाचा नाचताना हृदयविकाराने मृत्यू | पुढारी

गोविंदा आला रे: दापोलीत तरुणाचा नाचताना हृदयविकाराने मृत्यू

रत्नागिरी/कणकवली: पुढारी वृत्‍तसेवा; रत्नागिरीसह चिपळूण, खेड, राजापूर, लांजा, संगमेश्‍वर, देवरुख, गुहागर, दापोली व मंडणगडमध्येही उत्साहाला उधाण आले होते. दरम्यान, दहिहंडी उत्सवात दुपारी नाचत असताना छातीत कळ येवून हार्टअटॅक आल्याने पाजपंढरी(ता.दापोली) येथील वसंत चौगुले या गोविंदाचा मृत्यू झाला.

‘एक, दोन, तीन, चार…सिंधुदुर्गची पोरं हुश्शार ‘, गोविंदा आला रे….गोविंदा आला… असा विविध गाण्यांचा ठेका धरत व काही ठिकाणी डेजेच्या तालावर सिंधुदुर्गात शुक्रवारी जल्‍लोषपूर्ण वातावरणात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह जिल्हयात ठिकठिकाणी बालगोपाळ मंडळांनी दहिहंडीचे थर लावले होते. दरम्यान, डीजेचा दणदणाट आणि स्पिकरवरील ढाक्कूमाकूमवर ताल धरत रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत असताना, तो पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

यावर्षी कोरोना संकट निवळल्याने राज्य सरकारने दहिहंडीवरील निर्बंध उठवले. त्यामुळे गोविंदाचा उत्साह वाढला होता. शुक्रवारी सकाळपासूनच बालगोपाळांची दहिहंडीच्या तयारीची सुरवात सूर होती. अनेक ठिकाणी रस्त्यांवरही दहिहंडी बांधण्यात आल्या होत्या. गोविंदाच्या गाण्याचा ठेका धरत गोपाळ काल्याचा उत्साह बालगोपाळ आणि गोविंदांनी व्दिगुणीत केला.

 

Back to top button