गोवा

राजेश पाटणेकर यांना मंत्रिपद देणार – देवेंद्र फडणवीस

backup backup

डिचोली ः पुढारी वृत्तसेवा राजकारणात नेते अंतिम कधीच खुर्ची सोडत नाहीत. मात्र, राजेश पाटणेकर यांनी स्वतःहून 'नवा चेहरा द्या' असा प्रस्ताव त्यांनी दिला होता. आता रिंगणात उतरून योग्य निर्णय घेतला. भविष्यात ते मंत्री होतील, असा विश्वास भाजपचे गोवा विधानसभा प्रभारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिचोली येथे केले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर हे आधुनिक गोव्याचे निर्माते आहेत. त्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेक क्षेत्रात विकासाला चालना दिली. केंद्राने पायाभूत सुविधांसाठी गोव्याला प्रचंड निधी दिला. गोव्याचा विकासाचा आलेख खूप मोठा आहे. काँग्रेसचेही डबल इंजिन सरकार होते, पण त्यांनी काहीच विकास कामे केली नाहीत. आज तृणमूल काँग्रेस खोटी आश्वासने देत आहेत. गोव्यात तृणमूलचा फॉर्म्युला चालू शकत नाही हे जनतेच्या लक्षात येताच अनेकजण दूर झाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मगो पक्षाला तृणमूल सोबत जाणे महागात पडणारे आहे. आज मगो बदल प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून जर तृणमूलचा ध्येय मगोला मान्य आहेत का, तर त्यांना गोव्याची जनता अजिबात मत देणार नसून शेवटी मगो तृणमूलच्या बाहुल्या बनेल असे फडणवीस म्हणाले. भाजप हा मुख्य प्रवाहाचा पक्ष असून, या विकास राधाला साथ देणे गरजेचे आहे आप व तृणमूल सारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवावे, भाजपला साथ द्यावी, असे आवाहन देवेंद्रजी यांनी केले. डॉ. मिथुन महात्मे यांनी धोरणात्मक निर्णयघेताना लोकांना विश्वासात घेतले जात नाही, असा सवाल उपस्थित केला नोकरभरीत चुकीचे लोक निवडले जातात असे सांगून डॉ. प्रमोद सावंत यांनी कोव्हिड काळात उत्तम कामगिरी केली, असे सांगितले.

रोजगाराच्या संधी देताना सुशिक्षितांना नोकर्‍या मिळतील, त्या बाबत सरकारने खबरदारी घेतलेली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. भाजपचा शाश्वत धर्म हा सचोटीचा आहे. विकासासाठी काही गोष्टीत तडजोड करावी लागते, असे एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले. डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा सरकार तुमच्या दारी हा उत्तम उपक्रम राबवले आहेत. नेटवर्कबाबत समस्यांकडे सरकार लक्ष देत आहे. अनेक लोक बेकायदेशीर व्यवसाय करीत असून त्याचा फटका प्रामाणिक लोकांना होतो आहे. सरकारी यंत्रणा याबाबत विशेष लक्ष देत नाही अशी तक्रार परिष खानोलकर, राजेश केसरकर यांनी केली.

डिचोलीतील विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबर वार्तालापाचा कार्यक्रम शेट्ये प्लाझा येथे आयोजित करण्यात आला होता. जनतेच्या सहकार्यामुळे तीनवेळा आमदार जनतेच्या सहकार्यामुळे तीन वेळा आमदार झालो कुठे तरी थांबावे, असे वाटल्याने नवा चेहरा द्यावा, अशी विनंती आपण केली होती. पक्षाने पुन्हा ही जबाबदारी आपल्यावर टाकली. प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या विकासाला चालना देण्यात यश आलेले आहे. आगामी काळात केंद्र व राज्यात भाजप विकासाला मोठी चालना देणार असा विश्वास राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शेखर साळकर, तर आभार नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी मानले.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT