पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा मंत्रिमंडळाच्या आज (दि.१०) झालेल्या बैठकीमध्ये आमदारांचे भत्ते आणि पगार वाढीवर निर्णय झाला. भत्ता व निवृत्ती वेतन वाढीच्या दुरुस्तीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून यामध्ये घसघशीत वाढ केली आहे.
यापूर्वी आमदारांना महिन्याला ७ हजार ५०० रुपये गोव्याबाहेर गेल्यानंतर खर्च मिळत होता. तो आता दिवसाला १२ हजार रुपये मिळणार आहे. अधिवेशन काळामध्ये दिवसाला ३ हजार रुपये भत्ता होता तो आता ४ हजार रुपये करण्यात आलेला आहे. वाहनासाठी कर्ज १५ लाख होते ते ४० लाखापर्यंत वाढविण्यात आले आहे. घरासाठीचे कर्जही ३० लाखावरून ४५ लाख करण्यात आले आहे. वैद्यकीय खर्चामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतन पूर्वी १५ हजार होते आणि त्यामध्ये दरवर्षी २ हजार रुपयाने वाढ व्हायची. मात्र आता निवृत्तीवेतन ३० हजार रुपये असणार आहे आणि दरवर्षी ४ हजार रुपये त्यामध्ये वाढ होणार आहे. आमदारांसाठी ३०० लिटर पेट्रोल दिले जायचे आता ते ५०० लिटर दिले जाणार आहे. आमदारांना ५ कर्मचारी घेण्याची मुभा होती आता ही संख्या ७ वर नेण्यात आले आहे. आजच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान किसान निधी जो शेतकऱ्यांना देण्यात आला होता आणि ज्यांनी कागदपत्राची पूर्तता केली नाही त्यांच्याकडून पुन्हा निधी मागवण्यात आला होता. तो सुमारे ४.५० कोटींचा निधी गोवा सरकारने भरण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा :