No Confidence Motion | ‘यूपीए’च्या भ्रष्टाचाराने एक दशक वाया गेले, निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर निशाणा

अविश्‍वास प्रस्‍ताव चर्चेवेळी बाेलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
अविश्‍वास प्रस्‍ताव चर्चेवेळी बाेलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तुम्ही लोकांना स्वप्ने दाखवता, पण आम्ही त्यांची स्वप्ने सत्यात उतरवतो. परिवर्तन हे केवळ बोलण्यातून नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून होते. आम्ही सर्वांनाच सशक्त करण्यावर विश्वास ठेवतो, असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. संसद सभागृहात सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना (No Confidence Motion) अर्थमंत्री सीतारमन यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. यूपीएने संपूर्ण दशक वाया घालवले. कारण त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार आणि घराणेशाही होती. आज प्रत्येक संकट आणि प्रतिकूल परिस्थिती सुधारण्यात आणि संधीमध्ये बदलली आहे, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

आज भारतातील लोक 'बन गये, मिल गये, आ गये' असे म्हणतात- अर्थमंत्री सीतारामन

पुढे बोलताना सीतारामन म्हणाल्या, 'बनेगा', 'मिलेगा' असे शब्द आता लोक वापरात नाहीत, तर आज लोक 'बन गये, मिल गये, आ गये' असे शब्द वापरतात. यूपीएच्या काळात लोक 'बिजली आएगी' म्हणायचे, आता लोक 'बिजली आ गई' म्हणतात. विरोधक म्हणाले होते 'गॅस कनेक्शन मिलेगा', आता 'गॅस कनेक्शन मिल गया'… असे म्हणतात. पूर्वी लोक विमानतळ 'बनेगा' म्हणालचे आता विमानतळ 'बन गया' असे म्हणतात, असे सीतारामन यांनी संसदेत (No Confidence Motion) बोलताना स्पष्ट केले.

भारत भविष्यातील आर्थिक वाटचालीबद्दल आशावादी आणि सकारात्मक- अर्थमंत्री

पूर्वीच्या सरकारकडून गरीबी हटाओ असा नारा दिला जात होता, पण आज मोदी सरकारच्या विकासात्मक धोरणांमुळे देशातील गरीबी कमी झाली आहे. सरकारच्या धोरणांमुळे अवघ्या ९ वर्षात भारताची अर्थव्यवस्था उंचावली आणि भारताचा विकास झाला. देशात कोविडची परिस्थिती होती तरीही आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहोत, असेही सीतारामन यांनी म्हटले आहे. म्हणून, भारत आपल्या भविष्यातील आर्थिक वाटचालीबद्दल आशावादी आणि सकारात्मक असण्याच्या दुर्मिळ स्थितीत (No Confidence Motion) आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

२०१३ मध्ये मॉर्गन स्टेनलीने भारताचा समावेश जगातील पाच नाजूक अर्थव्यवस्थांच्या यादीत केला होता. भारताला नाजूक अर्थव्यवस्था म्हणून घोषित करण्यात आले. आज त्याच मॉर्गन स्टेनलीने भारताला अपग्रेड करून उच्च दर्जा दिला आहे. कोविड असूनही आपल्या सरकारच्या धोरणांमुळे अवघ्या ९ वर्षांत अर्थव्यवस्था उंचावली आणि आर्थिक विकास झाला. आज आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news