Goa Politics Churchill Alemao pudhari
गोवा

Goa Politics Churchill Alemao: वालका यांना उमेदवारी दिल्यास लढणार नाही... चर्चिल आलेमाव यांचा तडजोडीचा प्रस्ताव

Anirudha Sankpal

Churchill Alemao political proposal Congress

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सासष्टीच्या राजकारणात पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी महत्त्वाची राजकीय खेळी करत काँग्रेस नेतृत्वासमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघातून कन्या वालांका आलेमाव यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्यास आपण बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे सासष्टीतील काँग्रेसच्या उमेदवारीच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

आम आदमी पक्षातून बाहेर पडून प्रतिमा कुतिन्हो यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नावेली मतदारसंघातील उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रतिमा कुतिन्हो यांचे नाव संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चेत असतानाच चर्चिल

आलेमाव यांनी वालंका यांच्या उमेदवारीसाठी जोरदार दावा करत पक्ष नेतृत्वासमोर आपली भूमिका मांडली आहे.

चर्चिल यांनी यापूर्वीचे दिले उदाहरण

चर्चिल आलेमाव म्हणाले की, काँग्रेसने यापूर्वीही एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी दिल्याची उदाहरणे आहेत. आमदार मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नी डिलायला लोबो तसेच मंत्री बाबूश मॉन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मॉन्सेरात यांना पक्षाने संधी दिली होती. त्यामुळे बाणावली आणि नावेली या दोन्ही मतदारसंघांत आमच्या कुटुंबाचाही विचार व्हावा.

ते पुढे म्हणाले, जर दोन उमेदवारी देणे शक्य नसेल, तर किमान वालंका यांना नावेली मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. बाणावली हा आमचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. तेथे स्वतंत्र प्रचाराची फारशी आवश्यकता नसते. मात्र पक्षहितासाठी आणि विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी मी बाणावलीतून निवडणूक न लढविण्याची तयारी दर्शवत आहे.

वालंका यांनी चार निवडणुका लढवल्या

२०२२ च्या विधानसभा केला. निवडणुकीत वालंका यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नावेली मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. काँग्रेसचे आवर्तन फुर्तादो आणि वालं यांच्यात मांचे विभाजन झाल्याने भाजपचे उमेदवार उल्हास तुयेकर यांना विजय मिळविणे सोपे झाले, अशी राजकीय चर्चा झाली होती. यंदा तीच परिस्थिती टाळण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

वालंका आलेमाव यांनी यापूर्वी चार विधानसभा निवडणुका लढविल्या असल्या तरी त्यांना विजय मिळालेला नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी नावेली मतदारसंघात जनसंपर्क नागरिकांच्या भेटी आणि संघटनात्मक वाढविला असून कार्यकर्त्याच्या बैठका, बांधणीवर भर दिला आहे. त्यामुळे यावेळी विजयाची संधी अधिक असल्याचा दावा चर्चिल आलेमाव यांनी केला.

दिल्लीत वरिष्ठांची भेट

आपण दिल्ली येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली असून नावेली मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसने दोघांनाही उमेदवारी दिल्यास त्याचे स्वागतच राहील; अन्यथा केवळ वार्लका यांनाच नावेलीतून उमेदवारी देण्यात यावी, ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

२०२२ च्या अनुभवातून नवी रणनीती

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघात काँग्रेसचे आवर्तन विभागणी झाली. त्याचा थेट फायदा भाजपचे उमेदवार उल्हास तुयेकर यांना फुर्तादो आणि तृणमूल काँग्रेसच्या वालंका आलेमाव यांच्यात विरोधी मतांची झाल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. याच पार्श्वभूमीवर यंदा विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी वालंका आलेमाव यांना काँग्रेसची उमेदवारी द्यावी आणि त्याबदल्यात आपण बाणावलीतून निवडणूक न लढविण्याची तयारी असल्याचा प्रस्ताव चर्चिल आलेमाव यांनी पक्ष नेतृत्वासमोर ठेवला आहे. हा प्रस्ताव काँग्रेसच्या उमेदवारीच्या राजकारणात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT