

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समान विचाराच्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असे आवाहन प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आले. तसेच काँग्रेसला सोडून गेलेले नेते व कार्यकर्त्यांनी कोणत्याही अटींशिवाय पुन्हा पक्षात यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्याबोलताना चोडणकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळणे अत्यावश्यक आहे.
त्यासाठी काँग्रेस 'मोठा भाऊ' म्हणून आघाडीच्या चर्चेसाठी पुढाकार घेईल. भाजपविरोधी सर्व पक्षांशी संवाद साधून व्यापक आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, मागील काळात काँग्रेस सोडून इतर पक्षांत गेलेल्या किंवा पक्षांतर केलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात प्रवेश दिल् जाणार नाही, पक्षाची दारे त्यांच्यासाठ कायमस्वरूपी बंद राहतील, असा स्पष् इशाराही चोडणकर यांनी दिला.
कुतिन्होंची 'घरवापसी'
काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो या बैठकीस उपस्थित होत्या. त्यांच्या काँग्रेस पुनरागमनाबाबत पक्षनेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. काही राजकीय कारणांमुळे त्यांनी पक्ष सोडला होता; मात्र त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते. लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाची शक्यता आहे.