Cumbarjua Assembly Election Goa | कुंभारजुवेत राजेश फळदेसाई की सिद्धेश नाईक ?

Cumbarjua Assembly Election Goa | भाजपसमोर प्रश्न, काँग्रेसकडून समील वळवईकर; गोवा फॉरवर्डचाही दावा शक्य
goa assembly winter session
goa assembly winter session Pudhari
Published on
Updated on

पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर

तिसवाडी तालुक्यातील कुंभारजुवे विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. भाजपचे विद्यमान आमदार राजेश फळदेसाई यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की जिल्हा पंचायत सदस्य तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांच्यावर पक्ष विश्वास दाखवणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

goa assembly winter session
Mahayuti Legislative Council Victory | महायुतीचा दबदबा

राजेश फळदेसाई हे २०२२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, निवडणुकीनंतर काँग्रेसमधील आठ आमदारांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून त्यांचा दावा मजबूत मानला जात असला, तरी सिद्धेश नाईक यांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

सिद्धेश नाईक हे सलग दोन वेळा खोर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडून आले असून भाजपचे युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २०२२ मध्येही त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी भाजपने जेनिता मडकईकर यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसकडून समील वळवईकर यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून ३,०७२ मते मिळवली होती.

दुसरीकडे खोर्ली जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ग्लेन काब्राल यांना ४,५३७ मते मिळाल्याने तेही विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांच्यात युती झाल्यास हा मतदारसंघ गोवा फॉरवर्डला मिळावा, अशी भूमिका पक्षाध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी घेतल्याचे बोलले जाते. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या खोर्ली जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे कृष्णा परब यांना ४,७३८ मते मिळाल्याने पक्षाचाही या मतदारसंघा वर दावा असू शकतो.

आम आदमी पक्षाचे गोरखनाथ केरकर यांना २०२२ मध्ये १,०२२ मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी या पक्षासमोर आव्हान अधिक कठीण मानले जात आहे. २०२२ मध्ये अपक्ष म्हणून ३,८७० मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले रोहन हरमलकर हे जमीन बळकाव प्रकरणी तुरुंगात असल्याने त्यांची उमेदवारी अशक्य मानली जात आहे.

goa assembly winter session
Goa Assembly Election | नावेलीत पुन्हा कमळ फुलणार?

मडकईकरांच्या भूमिकेकडे लक्ष

कुंभारजुवे मतदारसंघाचे अनेक वर्षे आमदार व मंत्री राहिलेले पांडुरंग मडकईकर आगामी विधानसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र प्रकृतीची साथ आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता यावर त्यांचा निर्णय अवलंबून राहणार आहे.

२०२२ मध्ये पांडुरंग मडकईकर यांच्या प्रकृतीमुळे भाजपने त्यांच्या पत्नी जेनिता मडकईकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सिद्धेश नाईक यांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती; मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नव्हती. त्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेश फळदेसाई विजयी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news