Goa Night Club Fire Case  File Photo
गोवा

Goa Night Club Fire Case | लुथरा बंधूंसह 13 जणांविरुद्ध 4150 पानी आरोपपत्र दाखल

Goa Night Club Fire Case | 305 जण साक्षीदार, मोठ्या प्रमाणात दस्तावेज पुरावे सादर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

तीन महिन्यांपूर्वी हडफडे येथील बर्च बाय रोमियो र लेन या नाईट क्लबमध्ये झालेल्या अग्निकांडप्रकरणी गुरुवारी हणजूण पोलिसांनी क्लबचे मालक लुथरा बंधूंसह १३ जणांविरुद्ध ४१५० पानी आरोपपत्र हा न्यायालयात दाखल केले. यामध्ये ३०५ साक्षीदारांचा तसेच मोठ्या प्रमाणात दस्तावेज पुराव्यांचा समावेश आहे

बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पार्टीत बॅले डान्स सुरू असताना इलेक्ट्रिक फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना अचानक छताला आग लागून भडका उडाला होता. या अग्निकांडात नाईट क्लबचे २० कर्मचारी तसेच ५ पर्यटक मिळून २५ जणांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला होता.

हणजूण पोलिसांनी क्लबचे मालक, भागीदार, व्यवस्थापक, इव्हेंट ऑर्गनायझर, तसेच व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्या विरोधात या बार अँड रेस्टॉरंट नाईट क्लबमध्ये अनेक प्रतिबंधक सुरक्षा यंत्रणेचा अभाव असणे, या क्लबला आपत्कालीन दरवाजाचे सोय नसणे तसेच सदर बार अँड रेस्टॉरंट नाईट क्लब कोणत्याही योग्य परवानाशिवाय सुरू ठेवणे या व अनेक कारणावरून भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार १०५, १२५, १२५ (अ), १२५ (ब), २८७ या कलमांतर्गत तसेच ३३८, ३३६ (३), ३४० (२), ६१ (२), २३८, २४१, ३ (७) कलमांतर्गत गुन्हा नोंद करून १३ संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली. १३ संशयितांपैकी ९ जण न्यायालयीन कोठडीत आहेत तर ४ जणांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास हणजूणचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी केला.

अटक करण्यात आलेल्या मध्ये अजय गुप्ता (५५, गुडगाव हरियाणा) याला दिल्ली येथून अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. दुसरा आरोपी गौरव लुथरा (४४, दिल्ली) व तिसरा आरोपी सौरभ लुथरा (४०, दिल्ली) या दोघा या क्लबच्या भागीदार असलेल्या बंधूंना थायलंड येथून अटक करून भारतात आणले होते. सध्या तेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

अटक करण्यात आलेले वरील तिघेही संशयित आरोपी मे. बिईगं जीएस हॉस्पिटलीटी गोवा हडफडे एलएलपी" आणि "बर्च बाय रोमिओ लेन" या बार अँड रेस्टॉरंट क्लबचे भागीदार मालक आहेत. अटक करण्यात आलेला चौथा संशयित राजीव मोडक (४९, न्यू दिल्ली) हा या क्लबचा कॉर्पोरेट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होता. सध्या तोही न्यायालयीन कोठडीत आहे. पाचवा संशयित विवेक सिंग (२७, उत्तर प्रदेश) हा जनरल मॅनेजर न्यायालयीन कोठडीत आहे. सहावा संशयित विजयकुमार सिंग (३८, झारखंड) याला झारखंड येथून अटक करण्यात आली होती. तो न्यायालयीन कोठडीत आहे.

सातवा संशयिन प्रियांशु ठाकूर (३२, दिल्ली) गेन मॅनेजर हा जामिनावर आहे. आठव संशयित राजवीर सिंघानिया (३२ गोरखपुर, उत्तर प्रदेश) हा बार मॅनेज होता व तो सध्या जामिनावर आहेत. नववा संशयित हडफडे नागोव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर (४६, हडफडे न्यायालयीन कोठडीत आहे. दहाव संशयित बडतर्फ पंचायत सचिव रघुवी बागकर (४९, मयडे) न्यायालयीन कोठडीत आहे.

अकरावा संशयीत मयू कोलवाळकर (आल्त पर्वरी) हा के डान्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड य कंपनीचा संचालक, बारावा संशयिक मोहम्मद अफीफ अब्दुल साहब बाते (आल्त पर्वरी) हा के डान्स इव्हें प्रायव्हेट लिमिटेडचा जनरल मॅनेज असून हे दोघेही जामिनावर आहेत तेरावा संशयित आरोपी बर्च बाब रोमिओ लेन या क्लबच्या जागेचा मालक ब्रिटिश नागरिक सुरेंद्र कुमा खोसला (७८. हडफडे हा सध्या फरारी असल्याने त्याच्या विरोधान पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट, तसेच ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्याब आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजही न्यायालयाला सादर

हणजूण पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात या नाईट क्लबप्रकरणीचे विविध सरकारी खाती तसेच पंचायतमधून मोठ्या प्रमाणात दस्तावेज पुरावे म्हणून जोडले आहेत. घटनेच्या दिवशीचे तेथील परिसरातील सीसी टीव्ही फूटेजही पुरावे म्हणून सादर केले आहेत.

याप्रकरणाची चौकशी सरकारने उत्तर गोवा दंडाधिकाऱ्यांमार्फत केली होती, त्याचा अहवालही जोडण्यात आला आहे. साक्षीदारांमध्ये नाईट क्लबचे घटनेदिवशी असलेले कर्मचारी तसेच सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT