Goa Bench High Court | प्रदीप घाडी, सुनील दिवकरना दणका

Goa Bench High Court | हडफडे नाईट क्लब मालमत्तेची याचिका खंडपीठाने फेटाळली
Goa Bench High Court | प्रदीप घाडी, सुनील दिवकरना दणका
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबच्या मालमत्तेसंदर्भात प्रदीप घाडी आमोणकर व सुनील दिवकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली. ही याचिका प्रत्यक्षात खाजगी स्वरूपाच्या वादातून उद्भवलेली असून तिला जनहिताचे आवरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Goa Bench High Court | प्रदीप घाडी, सुनील दिवकरना दणका
Malegaon Municipal Corporation | महापालिका विद्युत विभागात नमाजपठण

तसेच महत्त्वाची तथ्ये दडपल्यामुळे याचिकाकर्ते 'स्वच्छ हातांनी' न्यायालयात आलेले नाहीत, असे निरीक्षण नोंद करण्यात आले आहे. ही याचिका प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी दाखल केली होती.

हडफडे येथील आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. याचिकेत संविधानातील कलम १४, १९(१) (ग) आणि २१ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला होता.

Goa Bench High Court | प्रदीप घाडी, सुनील दिवकरना दणका
Mirabag Barrage Project Goa | मिराबाग बंधारा वाद चिघळला! कंत्राटदारासह कंपनीविरोधात कुडचडे पोलिसांत गुन्हे दाखल

यूके नागरिक सुरिंदर कुमार खोसला, जो या प्रकरणातील गुन्ह्यात सध्या फरारी आहे आणि ज्याच्याशी याचिकाकर्त्यांचा करारनामा असल्याचे सांगितले जाते, त्याने नियोजन, जमीन व पर्यावरणविषयक कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रथम सुनावणी दरम्यान न्यायालयाने हा वाद खाजगी स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.

न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने १६ पानी आदेशात नमूद केले की, याचिकाकर्त्यांनी महत्त्वाची व निर्णायक तथ्ये दडपली असून अशा परिस्थितीत भारतीय संविधानाच्या कलम २२६ अंतर्गत असाधारण अधिकारक्षेत्राचा लाभ देणे योग्य ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news