पणजी : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यासाठी १० हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. झुआरी नदीवर बांधलेल्या २५३० कोटी खर्चाच्या नव्या पुलाचे गडकरी यांचे हस्ते आज (दि.२३) उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. Goa News
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग, श्रीपाद नाईक व गोव्याचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. राज्याला अपघात मुक्त करण्यासाठी १०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एकही अपघात होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. Goa News
देशातील दुसऱ्या क्रमांकाचे लांब झुआरी पूल असून या पुलाजवळ २८० कोटी खर्चून दोन टॉवर बांधण्यात येणार आहेत. या कामाची पायाभरणी गडकरी यांनी केली. पर्वरी येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ६५० कोटी खर्च करुन ७ कि.मी. लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. २०१४ पासून रस्ता मंत्रालयाने गोव्यात २५ हजार कोटींची कामे केली आहेत.
हेही वाचा