Latest

Galaxy pair : NASA च्या हबलने टिपली परस्परसंवादी आकाशगंगांची छबी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : NASA च्या हबल स्पेस टेलिस्कोपने परस्परसंवादी शेजाशेजारील दोन आकाशगंगेची नेत्रदीपक छबी टिपली आहे. या नाविन्यपूर्ण आणि अनोख्या आकाशगंगेच्या मिळालेल्या छायाचित्रामुळे आनंद व्यक्त करताना, हबलने Happy #HubbleFriday! ? असे ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

या आकाशगंगेच्या सभोवती सर्पिल हात, तारे आणि इतर आकाशगंगेचे वलय दिसत आहे. या परस्परसंवादी असलेल्या आकाशगंगा Arp-Madore 608-333 या नावाने ओळखल्या जातात. या दोन्हींमध्ये आंतरक्रिया होताना दिसत असून, त्या एकमेकांच्या शेजारी तरंगताना दिसत आहेत. या आकाशगंगेचे छायाचित्र निर्मळ आणि व्यवस्थित दिसत असले तरी, या दोन्ही आकाशगंगा विस्कळीत आणि विकृत आहेत. कारण यामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे परस्परसंवाद होत असल्याने, त्या एकमेकांना सूक्ष्मपणे विचलित करत आहेत. सर्वेक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या हबलच्या प्रगत कॅमेर्‍याने आकाशगंगेचा संवाद कॅप्चर केला.

हबलविषयी अधिक जाणून घ्या

हबल दुर्बीण ही अवकाशगंगेचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाशसंस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही दुर्बिण १९९० साली सोडण्यात आली आहे. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा: (https://www.nasa.gov/image-feature/goddard/2022/hubble-snaps-a-pair-of-interacting-galaxies)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT