लंडन : ही घटना आहे एका हायटेक चोरीची. वेळ फक्त 1 मिनिट, 6 चोर आणि 7 कोटींच्या कार. याची कुणालाही कुणकुणही लागली नाही. चालता-बोलता चोरट्यांनी 7 कोटींच्या कार लंपास केल्या. ही हायटेक चोरी पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या चोरीमुळे पोलिसही हैराण झालेत. चोरटे एका कारचे लॉक तोडून कारमध्ये बसले. त्यांच्यातला एक चोरटा गेट उघडण्यासाठी खाली उतरला आणि गेट उघडताच पाच चोरटे कार गेटबाहेर घेऊन गेले. गेट उघडणारा चोरटा मग धावत धावत जाऊन पुढे उभ्या असलेल्या कारमध्ये बसून पसार झालासुद्धा. हा सगळा प्रकार फक्त 59 सेकंदांत घडला. ( Luxury Cars )
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चोरी नेमकी कुठे झाली? त्याआधी चोरलेल्या कार कोणत्या आणि त्यांची किंमत किती आहे याची माहिती घेतली पाहिजे. यातील एरियल अॅटम रेसिंग कारची किंमत 55 लाख, मर्सिडिजची किंमत 84 लाख, पोर्शे कॅन्ने 1 कोटी 93 लाख, पोर्शे 1 कोटी 72 लाख आणि मर्सिडिज मेबॅक कारची किंमत 2 कोटी 50 लाख रुपये आहे. तेव्हा चोरीची ही घटना इंग्लंडच्या इक्सेस काऊंटीमधील आहे.
बुफलान गावातल्या ब्रेंटवूड रोडवरील कॅम्पसमध्ये चोरी झाली. 5 कारपैकी फक्त 1 कार सापडली. आता इतर कार शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या कार इंग्लंडच्या पोलिसांना सापडल्या नाहीत, तर त्यांनी मुंबई पोलिसांची मदत घ्यावी, असे आता नेटकरी म्हणू लागले आहेत.
हेही वाचा :