मुंबई; वृत्तसंस्था : बॉलीवूड आणि टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांतने मलेशियामध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये पाच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. आर. माधवनने पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. त्याने खास कॅप्शन देत शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. त्याने आपल्याला आज खूप आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Vedaant Madhavan)
देवाचा आशीर्वाद आणि त्याची कृपा यामुळे सारे काही घडत आहे. मी त्याचे मनापासून आभार मानतो. अशा शब्दांत आर. माधवनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वेदांतने 50, 100, 200, 400 आणि 1500 मीटरमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यापूर्वी देखील वेदांतने प्रभावी कामगिरी करून सार्यांना चकित केले होते. वेदांतने महाराष्ट्राकडून सहभागी होत खेलो इंडियामध्ये भाग घेतला होता. (Vedaant Madhavan)
हेही वाचा;