MVA Vajramuth Sabha : खरे रामभक्त आयोध्येला गेले असते, सुरतला नाही; उद्धव ठाकरेंचा 'वज्रमुठ' सभेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल | पुढारी

MVA Vajramuth Sabha : खरे रामभक्त आयोध्येला गेले असते, सुरतला नाही; उद्धव ठाकरेंचा 'वज्रमुठ' सभेत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : हे खरे रामभक्त असते तर आयोध्येला गेले असते, सुरतला नाही. फडणवीस हे कधीच आयोध्येला गेलेले नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. नागपूरमधील मविआच्या वज्रमुठ सभेत ते रविवारी (दि. १६) बोलत होते. (MVA Vajramuth Sabha)

सत्तेचं व्यसन हे वाईट असते. सत्तेची नशा पूर्ण देश उद्घवस्त करतो, असे म्हणत ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. महाविकासआघाडीच्या प्रत्येक सभेला लोकांचा भरभरुन प्रतिसाद आहे. आमचं सरकार नालायक असतं तर तुम्ही येवढ्या मोठ्या संख्येने आला नसता असे ही ठाकरे यावेळी म्हणाले. (MVA Vajramuth Sabha)

फडतूस म्हणजे बिनकामाचा (MVA Vajramuth Sabha)

शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा करायला सुद्धा सरकारी अधिकारी वेळेवर जात नाहीत. जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा वेळेला महत्त्व होते. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत होती असं ठाकरे म्हणाले. तसेच फडतूस म्हणजे बिनकामाचा, मग गृहमंत्र्यांना फडतूस नाही तर आणखी काय शब्द वापरला असता सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला.

मैदान मिळू नये म्हणून काड्या का करता

मी प्रत्येक सभेत सांगतो की, बाप चोरणारी औलाद तुमची. मर्द असाल तर मैदानात या, मैदान मिळू नये म्हणून काड्या का करता. या तुम्ही मैदानात तुम्ही देखील बोला आणि मीही बोलतो. जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे.

संभाजीनगर सभेत अलोट गर्दी झाली, त्यानंतर हे सगळे येऊन गेले म्हणून गोमुत्र शिंपडता. हे हिंदूत्व आहे का असा सवाल यावेळी त्यांनी केला. मला बोलतात काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडले. या हिंदुत्वाच्या भाकडकथा आम्हाला सांगू नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगावे की, भाजप आणि तुमचं काय सुरू आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याच नाही. पण यांचं हिंदुत्व हे गोमुत्रधारी आहे. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो