रेल्‍वे तिकिट ऑनलाईन बुक करताय? ‘या’ चुकीमुळे बँक खाते होईल रिकामे | पुढारी

रेल्‍वे तिकिट ऑनलाईन बुक करताय? 'या' चुकीमुळे बँक खाते होईल रिकामे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रेल्‍वे तिकिट ऑनलाईन सेवेचा लाभ कोट्यवधी प्रवासी घेतात. यासाठी ( Indian Railway Catering and Tourism Corporation ) IRCTC  ॲपचा वापर होतो. रेल्‍वे तिकीट बुकिंगपासून ते खाद्यपदार्थ बुकिंगपर्यंत सर्व गोष्टींसाठी या ॲपचा माध्‍यमातून केल्‍या जातात. मात्र तुम्‍हाला माहित आहे का? ऑनलाईन रेल्‍वे तिकिट बुकिंग करताना तुम्‍ही केलेली छोटी चूक तुमचं बॅक खाते रिकामे करु शकते. यासाठी ऑनलाईन रेल्‍वे तिकिट बुक ( Railway online ticket ) करताना नेहमी कोणती काळजी घ्‍यावी, याबाबत माहिती घेवूया…

Railway online ticket : ‘ही’ काळजी घेणे ठरते आवश्‍यक

  •  रेल्‍वेचे तिकीट बुक करण्‍यासाठी कोणत्‍याही थर्ड पार्टी वेबसाइटचा वापर करू नका. नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा ॲपद्वारेच तिकीट बुक करा.
  • तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसेल किंवा वेटिंग लिस्ट नसेल तर ट्विट करू नका.
  • जर कोणी स्वतःला IRCTC चा एक्झिक्युटिव्ह म्हणून सांगत असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. त्‍याच्‍याशी पिन नंबर किंवा खाते क्रमांक शेअर करू नका.
  • ऑनलाइन पेमेंट किंवा खाते तपशील कुणालाही नकळत शेअर करू नका.

रेल्‍वे प्रवाशांना IRCTC दिलेला सल्‍ला…

IRCTC ने आपल्या वापरकर्त्यांना irctcconnect.apk नावाचे संशयास्पद अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू नये, असे स्‍पष्‍ट केले आहे. तसेच व्हॉट्स ॲप आणि टेलिग्राम सारख्या सामान्यतः वापरल्या जाणार्‍या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून असे बनावट धोकादायक ॲप्स पसरवले जात आहेत, असाही इशारा दिला आहे.

Railway online ticket : अशी होवू शकते प्रवाशांची फसवणूक

रेल्‍वे ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्‍याबाबत IRCTC ने म्हटलं आहे की, “जर तुम्ही ‘एपीके’ फाइल स्थापित केली तर ते तुमच्या मोबाइल डिव्हाइसला धोका पोहचू शकतो.  स्कॅमर UPI तपशील आणि इतर बँकिंग माहिती यासारखी वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी बनावट ॲप्स वापरात असल्‍याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी सतर्क राहून असे कोणतेही बोगस ॲप डाउनलोड करू नये. Google Play Store किंवा Apple Store वरून नेहमी IRCTC चे अधिकृत ‘IRCTC Rail Connect’ मोबाईल ॲप डाउनलोड करावे.”, असे आवाहनही IRCTC ने केले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button