sonalee kulkarni  
Latest

tamasha live : अप्सरेचा हा नवीन डान्स नंबर पाहिला का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनाली कुलकर्णीचे नाव घेताच 'अप्सरा आली…'वर तिने केलेल्या बेभान नृत्य आणि अदाकारीची दृश्यं मराठी रसिकांच्या डोळ्यांसमोर तरळू लागतात. आता अजून एका नव्या गाण्यावर तिने दिलेला भन्नाट परफॉर्मन्स असंख्य चाहत्यांना वेड लावतो आहे. (tamasha live)

सोनालीच्या अभिनयासह आरस्पानी सौंदर्याचे चाहते देशभरात आहेत. हे सगळे कायमच तिच्या नवनव्या चित्रपटांची वाट पाहत असतात. समाजमाध्यमांवरही चांगलीच सक्रिय असलेली सोनाली वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्ससह आगामी चित्रपटांबाबतही वेळोवेळी माहिती देत असते. आताही सोनालीच्या अशाच एका पोस्टची चर्चा आहे. 'तमाशा लाईव्ह' या तिच्या बहुचर्चित चित्रपटातले एक नवेकोरे गाणे प्रदर्शित झाले आहे.

'मला तुझा रंग लागला' असे या गाण्याचे बोल आहेत. सोनाली अतिशय आकर्षक पेहरावात आपल्या अनोख्या पदन्यासाची जादू या गाण्यात दाखवते आहे. अल्पावधीतच या गाण्याला तब्बल १ मिलियनहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 'तमाशा लाइव्ह'ची खास गोष्ट म्हणजे यात स्वत: सोनालीनेही 'कडकलक्ष्मी' हे गाणे गायले आहे.

'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरलाही रसिकांचा मोठाच प्रतिसाद मिळाला आहे. ट्रेलरला ३ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. या चित्रपटात सोनालीसह पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव, मृणाल देशपांडे, सचित पाटील, नागेश भोसले, भरत जाधव, हेमांगी कवी, मनमीत पेम यांच्या भूमिका आहेत.

पुष्कर जोग यानेही 'कू'वर एक खास पोस्ट टाकली आहे. पुष्करच्या एका चाहतीने खास स्वत: तमाशा लाईव्हचा ट्रेलर तयार केला आहे. निकिता असे तिचे नाव असून आपल्या पोस्टमध्ये पुष्करने तिचे आभारही मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT