FIFA WC Final  
Latest

FIFA WC Final : फ्रान्सचा संघ अडचणीत, दिग्गज खेळाडूंना विषाणूची लागण

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी फ्रान्सचा संघ अडचणीत सापडला आहे. संघातील खेळाडूंना विषाणूची लागण होऊन ते एकामागून एक आजारी पडत आहेत. आज, रविवारी (दि. 18) स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी फ्रेंच संघ संकटात सापडला आहे. संघाचा बचावपटू राफेल वराणे (Raphael Varane) आणि इब्राहिमा कोनाटे (Ibrahima Konate) यांना तापामुळे मैदानात उतारू शकणार नाहीत. त्यांना आयसोलेशन मध्ये राहावे लागणार आहे.

मोरोक्को विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्याआधीपासूनच फ्रान्स आपल्या खेळाडूंच्या आजारपणाच्या समस्येशी झुंजत आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रेंच मिडफिल्डर ॲड्रिन रॅबिओट आणि सेंटर बॅक डेओट उपमिकानो तापामुळे मैदानात उतरू शकले नाहीत. मात्र, या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीतही फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली; पण आज अर्जेंटिना विरुद्ध होणाऱ्या फायनलपूर्वी फ्रान्सचे राफेल वराणे आणि इब्राहिमा कोनाटे हे खेळाडूही आजापणामुळे सामना खेळू शकणार नाहीत. ते आयसोलेशनमध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

काही खेळाडूंना वेगळे करण्यात आले आहे 

उपांत्य फेरीच्या सामन्यात गोल करणारा फ्रेंच स्ट्रायकर रेंडल कोलो मुआनी म्हणाला, "आमच्या कॅम्पमध्ये ताप पसरत आहे. जरी ते तितकेसे गंभीर नाही. जे खेळाडू आजारी आहेत ते सामना सुरु होण्‍यापूर्वी पूर्णपणे बरे होतील. आजारी असलेल्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. ते सर्व खेळाडू सध्या आपापल्या खोलीत असून सर्वजण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. आम्ही सामाजिक अंतर राखले आहे. फिट राहण्यासाठी चांगली काळजी घेत आहोत."

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT