Latest

FIFA WC Poland Vs Saudi Arabia : पोलंडने २ -० ने सौदी अरेबियाचा केला सुफडा साफ

अमृता चौगुले

दोहा(कतार); पुढारी ऑनलाईन : कतार येथे खेळविण्यात येणाऱ्या विश्वचषकात मेस्सीच्या बलाढ्य अर्जेंटिना पराभूत करुन धक्का दायक निकाल लावणाऱ्या सौदी अरेबियाचा पोलंडने सुफडा साफ केला. या सामन्यात सौदी अरेबियावर पोलंडने २ – ० अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह ग्रुप सी मध्ये पोलंडने अव्वल स्थान पटकावले आहे. या पुर्वी पोलंडचा मेक्सिको विरुद्धचा सामना टाय राहिला होता. आता चार अंकासह त्यांनी ग्रुपमध्ये आघाडी घेतली आहे. (FIFA WC Poland Vs Saudi Arabia)

विश्वचषकाच्या सातव्या दिवशी पोलंडने 'क' गटात सौदी अरेबियाचा 2-0 असा पराभव केला. पोलंडचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. मेक्सिकोविरुद्धचा पोलंडचा सामना अनिर्णित राहिला होता. दुसरीकडे, सौदी अरेबियाच्या संघाने यावेळी अर्जेंटिनाचा पराभव करून चमत्कार घडवता होता. पोलंडचे आता दोन सामन्यांतून चार गुण झाले आहेत. त्याचबरोबर सौदी अरेबियाचे दोन सामन्यांतून तीन गुण झाले आहेत. (FIFA WC Poland Vs Saudi Arabia)

पोलंडच्या पिओटर जिएलिंस्की याने ४० व्या मिनिटाला आणि रॉबर्ट लेवांडोस्की ८२ व्या मिनिटाला गोल नोंदवत सौदी अरेबियाचा २-० असा पराभव केला. दुसरीकडे अर्जेंटिनाचा पराभव करणाऱ्या सौदी अरेबियाला दुसऱ्या सामन्यात पहिला पराभव पत्करावा लागला. पोलंडच्या विजयात गोलरक्षक वोचेक सॅन्सीने पेनल्टी वाचवण्यासह अनेक उत्कृष्ट सेव्ह केले. सामन्यात मध्यरक्षक पिओटर झिएलेन्स्कीने पोलंडला पूर्वार्धातच आघाडी मिळवून दिली. त्याला 40 व्या मिनिटाला बॉक्सच्या आत रॉबर्ट लेवांडोस्कीने पास दिला.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT