Latest

FIFA WC 2022 : मोरोक्कोची धमाल बेल्जियम भूईसपाट; २-० ने पराभव

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आजचा सामना ग्रुप एच मधील मोरोक्को आणि बेल्जियम या संघात खेळवण्यात आला. या सामन्यावर वर्चस्व राखूनही बेल्जियमला पराभूत व्हावे लागले. या सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमला २-० ने पराभूत केले. हा सामना अल थुमामा स्टेडियमवर खेळवण्यात आला हाेता. (FIFA WC 2022)

विश्वचषक स्पर्धेतील आजचा दुसरा सामना मोरोक्को आणि बेल्जियम संघात खेळवण्यात आला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करून गोल डागण्याच्या प्रयत्न केला. परंतु दोन्ही संघाच्या बचावपटूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना गोल करण्यात यश आले नाही. दोन्ही संघांना गोल न करता आल्यामुळे पहिल्या हाफ मध्ये स्कोर ०-० असा राहिला. (FIFA WC 2022)

दुसऱ्या हाफमध्ये गोल करण्याच्या इराद्याने दोन्ही संघांनी आपल्या आक्रमण वाढवले. यामुळे दोन्ही संघानी करण्याची संधी निर्माण केली. परंतु त्यांना त्या संधीचा फायदा घेता आला नाही. सामन्यात दोन्ही संघाने एकमेकांच्या गोलपोस्टवर प्रत्येकी १० शॉट मारले. त्यापैकी मोरोक्कोने बेल्जियमच्या गोलपोस्टवर ४ शॉट टार्गेटवर मारले. तर, बेल्जियमने मोरोक्कोच्या गोलपोस्टवर ३ शॉट टार्गेटवर मारले.

सामन्याच्या ७३ व्या मिनिटाला मोरोक्कोच्या अब्दुल हमीद साबरीने फ्री किकवर शानदार गोल करत संघाचे खाते उघडले. गोलची परत फेड करण्य़ासाठी बेल्जियमच्या खेळाडूंनी चढाया केल्या पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. रेफरींनी दिलेल्या अधिकच्या वेळेत मोरोक्कोच्या झकेरिया अबू खलीलने सामन्याच्या ९०+३ व्या मिनिटाला गोल करत मोरोक्कोचा विजय निश्चित केला. संपूर्ण सामन्यात बेल्जियम संघाला सामन्यात अनेक चढाया करून एक ही गोल करता आला नाही त्यांमुळे हा सामना मोरोक्कोने २-० अशा फरकाने जिंकला.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT