Latest

FIFA WC 2022 And Ivana Knoll : ‘या’ मॉडेलने कतारचे नियम बसवले धाब्यावर; फुटबॉलची हॉट फॅन (Video)

अमृता चौगुले

दोहा(कतार); पुढारी ऑनलाईन : फिफा विश्वचषक २०२२ चा फिव्हर आता हळूहळू चढत चालला आहे. साखळी सामन्यांची फेरी आता संपण्याच्या मार्गावर आहे. यंदा कतारमध्ये खेळवला जात असणारा वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होण्यापुर्वीपासूनच चर्चेत आहे. कतार हा एक इस्लामीक देश आहे. येथे धर्माचे अत्यंत कठोरपणे पालन केले जाते. या देशात पेहरावा संदर्भात खासकरुन महिलांकडून वापरण्यात येणाऱ्या कपड्यांसंदर्भात कठोर नियम आहेत. फुटबॉल वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर या देशाने सामने पाहण्यास येणाऱ्या बाहेरील देशातील प्रेक्षकांना सुद्धा येथील सरकाने कठोर नियम घालून दिले आहेत, तसेच त्यांचे पालन आवश्यक केले आहे. पण, क्रोएशियाच्या एका मॉडेल व इन्स्टास्टारने कतारचे नियम धाब्यावर बसवत अत्यंत हॉट आणि बोल्ड कपड्यांमध्ये मैदानात हजेरी लावली. सध्या सर्वत्र या मॉडेचीच चर्चा सुरु आहे. (FIFA WC 2022 And Ivana Knoll)

कतार सरकारचे कपडे परिधानाबाबत एक ड्रेस कोड आहे. हा ड्रेसकोड त्याने फूटबॉल विश्वचषकासाठी सुद्धा लागू केला आहे. कपडे परिधानाचे हे नियम सर्वांनाच लागू आहेत. फूटबॉल खेळणारा संघ, त्यांचा सपोर्ट स्टाफ आणि सामने पहायला येणारे प्रेक्षकांना सुद्धा हे नियम लागू करण्यात आले आहेत. पण, क्रोएशियाची मॉडेल आणि इन्स्टास्टार इवॉन नॉल हिने मात्र या सर्वनियमांची तमा न बाळगता आपल्याला हवे तसे कपडे घालून क्रोएशियाचा सामना पाहण्यासाठी मैदाना हजेरी लावली. (FIFA WC 2022 And Ivana Knoll)

क्रोएशिया आणि मोरोक्को दरम्यानच्या सामन्यात इवॉनने लाल रंगाच्या चेकबोर्डसारखा अत्यंत हॉट ड्रेस परिधान केला होता. या कपड्यांमध्ये ती अत्यंत मादक दिसत होती. अशा कपड्यांमध्ये तिने आपल्या संघाचे मनोबल वाढवले. यावेळी ती जल्लोष करताना पाहण्यास मिळाली. यासह तिने मैदानाबाहेर बिकिनीमध्ये स्वत:चे फोटो शूट केले. मैदानात हजर असतानाचा ड्रेस आणि बिकीनी यामुळे इवॅाना सध्या फूटबॉल विश्वचषकात चर्चेचा विषय बनली आहे. अशा पद्धतीने एक प्रकारे तिने कतारचे नियम मोडले आहे. आता तिच्यावर कारवाई होण्याची भिती वर्तवली जात आहे. (FIFA WC 2022 And Ivana Knoll)

इवॉनाने मैदानातील फोटो आणि बिकीनीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रीया आल्या आहेत. अनेकांनी तिच्या या कृत्याबद्दल तिची कठोर शद्बात निंदा केली आहे. आपण वेगळ्या देशात जातो तेव्हा तेथील नियमांचा, तेथील आचरण पद्धतीचा मान ठेवत त्यांचे पालन केले पाहिजे असा सल्ला तिला अनेकांनी दिला आहे. आता सर्वजण तिच्यावर कोणती कारवाई होते हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. शिवाय ती क्रोएशियाच्या पुढील सामन्यात कोणते कपडे परिधान करणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहेत.

कतारमधील ड्रेस कोड

कतारच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटने महिला आणि पुरुषांना तेथील संस्कृतीचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. फिफा वर्ल्ड कपसाठी कतारमध्ये येणा-या लोकांनी संपूर्ण अंग झाकलेले असावेत असे कपडे परिधान करावेत. शरीराचा भाग उघडा राहिल असे कपडे घालू नयेत. चाहत्यांनी त्यांचे खांदे आणि गुडघे झाकले जातील असेच कपडे वापरावेत. शॉर्ट आणि स्लीव्हलेस टॉप परिधान करण्यास मनाई केली आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT