FIFA WC : कतार चाहत्यांकडून जर्मनीचा निषेध, ‘ओझील’चा फोटो झळकावून दिले प्रत्युत्तर

FIFA WC : कतार चाहत्यांकडून जर्मनीचा निषेध, ‘ओझील’चा फोटो झळकावून दिले प्रत्युत्तर
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारमध्ये सध्या सुरू असलेली विश्वचषक स्पर्धा ही फुटबॉलची आहे की वादाची असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. स्पर्धेतील सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान वाद उफाळणे ही नित्याची बाब झाली आहे. रविवारी (दि. 27) रात्री उशीरा खेळल्या गेलेल्या जर्मनी विरुद्ध स्पेन सामन्यावेळी असाच काहीसा प्रकार घडला. कतारच्या काही प्रेक्षकांनी जर्मनीचा माजी खेळाडू मेसूत ओझिल याचा फोटो हातात धरून आणि तोंडावर पट्टी बांधून थेट जर्मनीचा निषेध केला. जपानविरुद्धच्या सामन्यावेळी जर्मन खेळाडूंनी तोंडावर हात धरून केलेल्या कृतीला कतार नागरीकांनी एकप्रकारे प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. (fifa wc qatari fans hit back at germany holding pictures of mesut ozil)

कतारमधील काही फुटबॉल चाहत्यांचा एक गट जर्मनीचा माजी फुटबॉलपटू ओझिलचा फोटो घेऊन रविवारी येथील स्टेडियममध्ये पोहोचले. पहिल्यांदा वाटले की हे चाहते ओझिलला मिस करत आहेत. पण काहीवेळाने त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे समोर आले.एका हातात ओझिलचा फोटो धरून आणि एका हाताने तोंड झाकून त्यांनी थेट जर्मन खेळाडूंचा निषेध नोंदवला.

फिफाने विश्वचषक सामन्यांदरम्यान 'वन लव्ह' आर्मबँड हातावर बांधण्यास बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ जर्मन खेळाडूं आक्रमक झाले आणि त्यांनी बुधवारी (23 नोव्हेंबर) जपानविरुद्धच्या सामन्यापूर्वी फोटोसेशनच्या वेळेस तोंडावर हात ठेवून फिफाचा निषेध नोंदवला. तोंडावर उजवा हात ठेवून एक प्रकारे आमचा आवाज दाबला जात असल्याचे जर्मन खेळाडूंच्या त्या कृतीतून निदर्शनास आले. स्पर्धा सुरू झाल्यानंतर 8 संघांच्या खेळाडूंनी विश्वचषकादरम्यानच्या सामन्यांमध्ये समलैंगिक संबंधांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. तसेच एलजीबीटीक्यू समुदायाचे प्रतीक असणारा वन लव्ह बँड हातावर बांधून मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण फिफाने याला आक्षेप घेतला. जर एखादा संघ किंवा कोणताही खेळाडू वन लव्ह बँड हातावर बांधून मैदानात उतरला तर तो फिफाच्या नियमांचा भंग ठरेल आणि अशी कृती करणा-या खेळाडूंवर बंदी घालण्यात येईल असा इशारा फिफाने दिला. त्यामुळे चिडून जर्मन संघाने थेट फिफालाच निशाण्यावर घेतले. अखेर रविवारी कतारमधील चाहत्यांनी जर्मन खेळाडूंना प्रत्युत्तर देत माजी फुटबॉलपटू ओझीलला झालेल्या सापत्न वागणुकीबद्दल जर्मनीचा निषेध नोंदवला. (fifa wc qatari fans hit back at germany holding pictures of mesut ozil)

रशियात 2018 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतून जर्मनी लवकर बाहेर पडला होता. त्यानंतर संघातील स्टार खेळाडू ओझीलला वांशिक अपमानाचा सामना करावा लागला होता. हा अपमान सहन न झाल्याने ओझिलनेही जर्मन संघाला सोडचिठ्ठी दिली. ओझिल हा मूळचा तुर्कीचा पण जर्मनीत जन्मलेला खेळाडू आहे. 2018 च्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवानंतर त्याने, 'जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मी जर्मन असतो पण हरल्यावर मी स्थलांतरित होतो,' असे विधान करत जर्मन फुटबॉल महासंघ, चाहते आणि प्रसारमाध्यमे माझ्याशी वांशिक भेदभावाचे वर्तन करत असल्याचा आरोप केला होता. (fifa wc qatari fans hit back at germany holding pictures of mesut ozil)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news