Whats App File Download Scam: एक भयंकर सायबर फ्रॉड समोर आला आहे. दिल्लीतील एका चार्टर्ड अकाऊंटन्टने व्हॉट्स अॅपवर आलेली क्रेडिट कार्ड लिमीट वाढून देण्याचे आश्वासन देणारी एक फाईल डाऊनलोड केली. ही फाईल डाऊनलोड करताच त्यांना तब्बल ७५ हजार ६९४ रूपयांचा फटका बसला.
दिल्लीतील हे सीए कोटक महिंद्रा बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. फ्रॉड करणाऱ्याने व्हॉट्स अॅप लिंकद्वारे सीएच्या या क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन खरेदी केली. हा एक नवा सायबर फ्रॉड असून यापासून लोकांनी सावध रहायला हवं.
तपासत असं आढळून आलं की ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या गँगचा सदस्य हा यापूर्वी क्रिडिट कार्डच्या कंपनीत काम करत होता. त्यामुळं त्याच्याकडे ग्राहकांच्या डाटाचा अॅक्सेल होता. त्यानं याच माहितीचा गैरवापर केला. त्यानं कोटक महिंद्रा बँकेचे एक फेक अॅप तयार केलं. त्यानं त्याद्वारे एक बोगस APK फाईल तयार केली.
त्याने एक फेक सीम कार्ड वापरून आपण बँक अधिकारी असल्याचं ग्राहकाला भासवलं. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला APK फाईल डाऊनलोड करण्यासाठी मनवलं. त्यानं क्रेडिट कार्डचे लिमीट वाढवण्याचं लालुच त्यांना दाखवलं होतं.
ज्यावेळी पीडित ग्राहकानं व्हॉट्स अॅपमधीलमधील ती फाईल डाऊनलोड केली. त्यानंतर या फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीला पीडित ग्राहकाच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्ड डिटेल्सचा संपूर्ण अॅक्सेस मिळाला. त्यानंतर त्यांनी झेप्टोची अॅप लिंक वापरून अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. या वस्तू फरिदाबादमध्ये डिलिव्हर झाल्या. त्यानंतर या वस्तू olx वर विकण्यात आल्या.
दरम्यान, पीडित सीएने ४ फेब्रुवारी रोजी सायबर पोलिसांकडे याबाबतची तक्रार दिली होती. त्यानंतर साबयर सेलने विशेष ऑपरेशन टीम तयार केली. तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर जिथं या वस्तू डिलिव्हर झाल्या आहेत ते लोकेशन ट्रॅक करण्यात आले. ही लोकेशन लखीमपूर गावातील सुरजकुंड येथील होती.
यानंतर पोलिसांनी चार लोकांना अटक केली आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आला. अटक केलेल्यांमध्ये अभिषेक कुमार झा(२४), आशिष कुमार ओझा(२३), विवेक कुमार उर्फ मोनू (३७) आणि इकरार (२३) यांना अटक करण्यात आली.