AI.com Domain pudhari photo
फीचर्स

AI.com Domain: १० वर्षाचा मुलगा.. ३०० रूपयांचा डोमेन अन् एका रात्रीत कमवले तब्बल ६०० कोटी रूपये

मधल्या काळात AI.com हे डोमेन अनेकवेळा लीजवर देण्यात आले होते.

Anirudha Sankpal

AI.com Domain Story: ही कहानी आहे १९९३ मध्ये अवघ्या १० वर्षाचा असलेल्या एका मुलाची... या मुलाने AI.com नावाची वेबसाईट डोमेन खरेदी केला होता. त्यावेळी हा एक अत्यंत साधारण इंटरनेट डोमेन होत. त्यावेळी AI काय आहे हे कोणाला माहिती देखील नव्हतं. तसंच सोशल मीडिया नव्हता. चॅटबॉट्स नव्हते. लोकं रोज AI शी बोलत नव्हते. त्यावेली या दोन अक्षराच्या डोमेनची किंमत देखील फार नगण्य होती.

मात्र आज हाच AI.com डोमेन जवळपास ७० मिलिनय डॉलरमध्ये विकला गेला आहे. भारतीय रूपयात याची किंमत जवळपास ६०० कोटी रूपये इतकी होते. हा फक्त एक व्यवहार नाही तर इंटरनेटवर डोमेनची किंमत कशी बदलते याचे हे उदाहरण आहे. ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी डोमेन डील आहे.

कशी झाली डील?

ज्या व्यक्तीनं AI.com डोमेन खरेदी केला होता त्या व्यक्तीचं नाव हे अरस्यान इस्माईल असं आहे. तो मलेशियामधील एक टेक व्यावसायिक आहे. १९९३ मध्ये ज्यावेळी इंटरनेट नवीन होतं त्यावेळी त्यांनी फक्त एक गंमत म्हणून हा डोमेन रजिस्टर केला होता. त्यावेळी त्यांना AI हे दोन शब्द भविष्यात एवढे मौल्यवान होतील असं कोणाला वाटलं नव्हतं.

त्या काळात डोमेन खरेदी करण्याची किंमत फार कमी होती. मिळालेल्या माहितीनुसार अरस्यान इस्माईलने AI.com अत्यंत नगण्य किंमतीला खरेदी केलं होतं. हे त्या काळात खूपच साधारण डोमेन नाव होतं.

मधल्या काळात AI.com हे डोमेन अनेकवेळा लीजवर देण्यात आले होते. वेगवेगळ्या कंपन्यांनी हा डोमेन काही काळासाठी वापरला, मात्र डोमेनची खरी मालकी ही अरस्यान इस्माईलकडेच होती.

२०२५ मध्ये आला मोठा ट्विस्ट

२०२५ मध्ये एक मोठा ट्विस्ट आला होता. AI.com हे डोमेन काही काळ त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार डोमेनवरील नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना पुन्हा १० मिलियन डॉलर्स भरावे लागले होते. म्हणजे जवळपास ८० कोटी रूपये देऊन त्यांनी या डोमेनची मालकी पुन्हा मिळवली होती.

त्यावेळी AI जगभरातील एक हॉट ट्रेंड झाला होता. त्यांना माहिती होतं की पुढे याची किंमत अजून वाढणार आहे. त्यामुळेच त्यांनी ३०० रूपयांमध्ये खरेदी केलेल्या डोमेनची पुन्हा मालकी मिळवण्यासाठी ८० कोटी रूपये खर्च केले होते.

कोणी खरेदी केलं डोमेन?

अरस्यान इस्माईल यांनी हे AI.com डोमेन पुन्हा खरेदी केल्यानंतर काही काळ आपल्या जवळच ठेवलं. त्यानंतर त्यांनी २०२६ मध्ये हे डोमेन त्यांनी Crypto.com च्या सीईओंना जवळपास ७० मिलियन डॉलरमध्ये विकलं.

आता AI.com ला Crypto.com च्या सीईओंनी खरेदी केलं आहे. Crypto.com हे डिजीटल फायनान्समधील जगातील एक मोठं नाव आहे. आता ते AI कडे देखील वाटचाल करत आहेत. AI.com चा वापर आता एक नवा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षात जगभरात AI चा मोठा सुळसुळाट झाला आहे. आता AI सर्वच क्षेत्रात वापरलं जात आहे. त्यामुळे AI हा एक मोठा ब्रँड झाला आहे. त्यामुळेच AI.com सारख्या नावाला एवढी डिमांड आली आहे. ते दोण AI च्या संदर्भात कोणतीही सेवा तयार करण्यास इच्छुक आहे त्यासाठी हे नाव खूप कामाचं आहे. वापरकर्त्यांना देखील हे नाव विश्वासू वाटतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT