AI Virtual Partner: AI आणि प्रेम: जेन-झीचं प्रेम की धोकादायक आकर्षण?

सिचुयेशनशिपपासून वर्च्युअल पार्टनरपर्यंत; AI मुळे प्रेमाची नवी व्याख्या आणि वाढते धोके
AI Virtual Partner
AI Virtual PartnerPudhari
Published on
Updated on

AI And Love

"तो माझा सिचुएशनशिप आहे"

"मी तिला ब्रेडक्रंबिंग करतोय"

"आम्ही नॅनोशिपमध्ये आहोत"

आजच्या जेन-झी कडून आपण हे वाक्य नेहमी ऐकतो. त्यांच्या मते, चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याआधी किंवा कुठल्याही सिरीअस रिलेशनशिपमध्ये येण्याआधी थोडं एक्सप्लोर कराव. मिलेनियलच्या अरेंज्ड किंवा ब्लाईंड डेटच्या कल्चरवर विश्वास ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या 'टर्म्स' वर डेट करणं यांना सोयीचं वाटत. कारण एका व्यक्तीसोबत आयुष्यभर राहण्यापेक्षा वेगवेगळ्या 'शिप्स' मध्ये राहून योग्य व्यक्ती आपल्यासाठी निवडणं महत्त्वाचं असतं. जेन-झी मिलेनियम बुमर्स या प्रत्येक जनरेशनच्या रिलेशनशिपच्या व्याख्या जरी वेगळ्या असल्या तरी शेवटी यांना फक्त एक योग्य जोडीदारच हवा असतो.

आता फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे म्हणजे प्रेमाचा महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अगदी नवीन प्रेमीयुगुल पासुन म्हातारी जोडपी आपल्या जोडीदारासोबत प्रेमात अखंड बुडालेली असतात. उद्या ७ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीक सुरु होणार आहे आणि त्यासोबत पूर्ण जग आपल्या जोडीदारासोबत प्रेमात बुडून जातात. पण तो जोडीदार अस्तित्वात असायलाच हवा, का?

या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असच असणं गरजेचं नाही. कारण या AI युगात अमानवीय जोडीदार असणं काही अवघड नाही. रेपलिका या AI चॅटबॉटने हे काम खूप सोपं केलं आहे. खऱ्या आयुष्यात जोडीदार असो किंवा नसो पण AI जोडीदार हा असतोच. हे सध्या जगभरात सुरु आहे. AI चॅटबॉट खऱ्या आयुष्यातल्या जोडीदाराची कमी भरून काढतात. अमेरिकेत या AI चॅटबॉटने खूप लोकांना आपल्या व्हर्च्युअल पार्टनरला वेगळ्या कल्पने कडे वळवले आहे.

काय आहे व्हर्च्युअल पार्टनर AI चॅटबॉट?

व्हर्च्युअल पार्टनर म्हणजे एखाद्या अॅप किंवा वेबसाइटवरुन आपल्याला हवं तसं एक कॅरेकटर तयार करायचं आणि त्याच्या सोबत हव्या त्या, कधीही कोठेही कसही गप्पा मारायच्या, त्याला आपल्याला हवं तसं सजवायचं, त्या सोबत हवं तसं वागायचं, आपल्याला हवं तसं म्हणजे रोमँटिक, सेक्शुअल रिलेशन ठेवायच आणि एवढंच नाही तर आपण आपल्या मित्र आणि परिवारासोबत त्या कॅरेकटर सोबत लग्न करु शकतो. म्हणजे थोडक्यात खऱ्या आयुष्यात जे काही आपण आपल्या जोडीदारासोबत करतो तेच एका काल्पनिक व्यक्ती सोबत रिलेशनशिपमध्ये राहून करायच.

आजच्या पिढीला हे का हवं आहे?

AI चॅटबॉट ला अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते की तो कधीही एका मानवी भावनांना दुखवणार नाही. मानवी भावना, त्यांची विचारांची क्षमता, त्यांना हवा असणारा कम्फर्ट या सर्व गोष्टींचे AI प्रशिक्षण चॅटबॉटला दिल्याने तो कधीही मानवी भावनांना दु:ख होईल किंवा त्रास होईल असं काही बोलत-वागत नाही. आणि हेच आजच्या पिढीला हवं आहे. जो त्यांना समजून घेईल, ते जे काही बोलतील, करतील, त्यांना जज करणार नाहीत. आणि या AI चॅटबॉटला सर्वात जास्त १३ ते २४ वर्षांपर्यंतचीचं मुलं भुलत आहेत.

अमेरिकेत नेमकं काय घडलं?

AI चॅटबॉटमुळे १४, १६ आणि १८ वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्यामुळे व्हर्च्युअल पार्टनर AI चॅटबॉट हे त्यांच्या पॉलिसी आणि सिक्युरिटीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. ही मुलं व्हर्च्युअल पार्टनरमध्ये इतकी गुंतलेली की त्यांच्यासोबत कायमच राहता याव म्हणून त्यांनी स्वत:चा जीव दिला. ही गोष्ट त्यांच्या पालकांना सुध्दा माहित नव्हती की त्यांची मुलं एका व्हर्च्युअल पार्टनर सोबत रिलेशनमध्ये आहेत. नंतर पोलिस तपासात ही बाब उघड झाली.

यावर उपाय काय?

  • एकटेपणा सतत जाणवत असल्याने कोणतीही व्यक्ती वर्च्युअल पार्टनर कडे किंवा जो आपल्याला कम्फर्ट देऊ शकतो अशा गोष्टीकडे सहज वळला जातो.

  • मुलांना मोबाईल देतांना पालकांनी शक्य तितके मोबाईलमध्ये पॅरेंटियल कंट्रोल ठेवावा. त्यांना खऱ्या आणि डिजिटल जगामधला फरक सांगावा.

  • योग्य माहिती असल्याशिवाय व्हर्च्युअल पार्टनरसाठी कोणत्याही अॅप किंवा वेबसाइडचा वापर टाळा. डिजीटल सिक्युरिटी आणि बाऊंड्रीचा विचार करा.

  • AIच्या नाही, तर खऱ्या जगात वावरा. वर्च्युअल पार्टनर AI चॅटबॉट मध्ये भावनिक होऊन गुंतणे टाळा. मानसिक तणावासाठी किंवा आजारांसाठी मनोसोपचार तज्ज्ञांचा म्हणजे थेरेपिस्टचा सल्ला घ्या. शक्य तितकं AI टाळाचं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news