टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमसाठी असणारा 'सपोर्ट' (Support) लवकरच बंद केला जाणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२५ ही Windows 10 च्या समर्थनाची अंतिम तारीख असणार आहे. या तारखेनंतर, Windows 10 वापरणाऱ्या डिव्हाईसला कोणतेही नवीन सुरक्षा अपडेट्स (Security Updates), फीचर्स किंवा तांत्रिक मदत (Technical Support) मिळणार नाही.
Windows 10 वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी ही एक महत्त्वाची सूचना आहे. आपले डिव्हाईस आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी Windows 11 कडे जाण्याचा किंवा ESU प्रोग्रामचा विचार करणे आवश्यक आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
सुरक्षेचा धोका
मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी उपाध्यक्ष (EVP) आणि ग्राहक सीएमओ (Consumer CMO), युसूफ मेहदी यांनी स्पष्ट केले आहे की, सपोर्ट बंद झाल्यानंतरही Windows 10 वर चालणारे डिव्हाईस काम करणे सुरू ठेवतील. मात्र, सुरक्षेचे पॅच (Security Patches) न मिळाल्याने तुमचे कॉम्प्युटर सायबर हल्ले, मालवेअर आणि व्हायरससाठी अधिक असुरक्षित (Vulnerable) बनतील. तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो.
अद्ययावत संरक्षण
युजर्सना दिलासा देण्यासाठी, मायक्रोसॉफ्टने ऑक्टोबर २०२८ पर्यंत त्यांच्या 'डिफेंडर अँटीव्हायरस'साठी (Defender Antivirus) अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे कमी-पातळीच्या धोक्यांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळेल.
काय आहे Paid ESU प्रोग्राम
ज्या युजर्सना लगेच Windows 11 वर अपग्रेड करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने १५ ऑक्टोबर २०२५ पासून 'एक्सटेंडेड सिक्युरिटी अपडेट' (ESU) प्रोग्राम सुरू केला आहे.
वैयक्तिक युजर्ससाठी (Personal Users)
या प्रोग्रामसाठी वार्षिक 30 डॉलर (सुमारे २५०० रुपये) शुल्क आकारले जाईल, किंवा 'फ्री विंडोज बॅक' (Free Windows Back) आणि 'फ्री मायक्रोसॉफ्ट रिवॉर्ड पॉईंट्स' (Free Microsoft Reward Points) असे पर्यायही उपलब्ध आहेत.
व्यवसायिक खात्यांसाठी (Business Accounts):
प्रति डिव्हाईस वार्षिक 61डॉलर्स खर्च येईल आणि ही योजना तीन वर्षांपर्यंत नूतनीकरण (Renew) करता येईल.
मायक्रोसॉफ्टने सर्व युजर्सना सोयीसाठी आणि डेटा सुरक्षिततेसाठी Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर हळूहळू अपग्रेड (Upgrade) करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, Windows 11 मध्ये, पूर्वीच्या व्हर्जनच्या तुलनेत सुरक्षा-संबंधित समस्यांमध्ये 62% कपात झाली आहे आणि कामाचा वेग 50% पर्यंत वाढतो.