फीचर्स

आज दिवाळी पाडवा जाणून घ्‍या शुभ मुहूर्त

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : दिवाळी सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीमध्ये पाडवा एक महत्‍तवाचा सण आहे.. हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी शूभ मुहूर्त म्‍हणून सोने-नाणे, विविध वस्‍तू खरेदी केल्‍या जातात. तसेच व्यापारी मंडळी आपल्या सर्व जमाखर्चाच्या वह्या, साहित्यांची याच दिवशी पूजा करतात.

विशेष म्‍हणजे लक्ष्मीपूजनानंतर आणि भाऊबीजेपूर्वी पाडवा सण येतो. परंतु यावर्षी भाऊबीज आणि पाडवा एकाच दिवशी आहे. या वर्षी बुधवार (दि.26) दिवाळी पाडवा आणि भाऊबीज आहे. तर या सणाला कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असेही म्‍हटले जाते.

पाहा दिवाळी पाडव्याचा आजचा शुभ मुहूर्त 

दिवाळी पाडवा आणि वही पूजणासाठी पहाटे 3:30 ते सकाळी 9:30, त्‍यानंतर सकाळी 11:00 ते 12:30. असा मुहूर्त आहे. तसेच सकाळी 11 ते दु.12:15 आणि दु. 4:30 ते सायं. 6 असाही शूभ मुहूर्त असेल. तसेच सायंकाळी 7:40 पासून रात्री 9:10 या वेळेत वहीपूजन करण्यासाठी मुहूर्त आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT