Pineapple On Pizza Controversy pudhari
फीचर्स

Pineapple On Pizza Controversy: संस्कृतीचा अपमान म्हणत पिझ्झावर अननस टाकण्यास दिला नकार... इटालियन शेफला गमवावी लागली नोकरी

सांस्कृतिक स्वाभिमानापोटी शेफने उचलले पाऊल; जाणून घ्या या अजब प्रकरणाची रंजक माहिती.

Anirudha Sankpal

Pineapple On Pizza Controversy Australia: पिझ्झावर अननस (Pineapple) टाकण्यास नकार दिल्यामुळे एका इटालियन शेफला त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले, कारण त्याच्या मते हे त्याच्या संस्कृतीचा अनादर करणारे होते. डेव्हिड टॅम्बोरिला (Davide Tamborella) नावाचा शेफ ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बन येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता, परंतु त्याच्या वर्तनाबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.

अन्याय झाल्याचा दावा

या कारवाईनंतर शेफ डेव्हिड यांनी त्यांना अन्यायकारकरित्या नोकरीवरून काढून टाकलं असल्याचा दावा केला. अधिक माहिती घेतली असता शेफने पिझ्झावर अननस टाकण्यास एक नाही तर तीनवेळा नकार दिला होता. यातील एक घटना समारंभातील पाहुण्यांबाबत घडली होती.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्यात ज्या भागात हे रेस्तराँ आहे तिथं अननसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. तिथं अननस प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांना याच भागातून अननसाचा पुरवठा होतो. तिथं अननसाचा १६ मीटर उंचीचा पुतळा देखील आहे.

फक्त अननस कारण नाही?

नोकरीवरून काढून टाकलेल्या शेफच्या भाषेबाबत देखील आक्षेप घेण्यात आला होता. त्याचे संवाद कौशल्य देखील चांगले नसल्याचे म्हटले होते. डेली मेलला रेस्तराँच्या व्यवस्थापनाने प्रतिक्रिया दिली होती. त्यात या शेफला काढून टाकण्याचे पिझ्झा टॉपिंग हे एकमेव कारण नाहीये असा खुलासा केला.

रेस्तराँ प्रशासनाच्या निर्णयाविरूद्ध शेफ डेव्हिडने ऑस्ट्रेलियाच्या फेअर वर्क कमिशनकडे दाद मागितली होती. मात्र या कमिशनने आपल्या निकालात टॅम्बोरिला यांनी पिझ्झाच्या टॉपिंगमध्ये अननस टाकण्यास नकार दिला कारण एक इटालियन म्हणून पिझ्झावर अननस टाकणे हे त्याच्या संस्कृतीचा अनादर आहे.

दावा फेटाळून लावला

मिळालेल्या माहितीनुसार डेव्हिड यांनी गेल्या चार वर्षात तीसऱ्यांना पिझ्झावर अननस टाकण्यास नकार दिला होता. यापूर्वी त्याने आपल्या बॉसला इटालियनने पिझ्झावर अननस न टाकणे किती महत्वाचे आहे हे चेक करण्याची विनंती केली होती.

शेवटी डेव्हिड टॅम्बोरिलाचा अन्याय झाल्याचा दावा फेटाळून लावण्यात आला. मात्र लिंक्डइनवर असे दिसून येत आहे की आता डेव्हिड दुसऱ्या रेस्तराँमध्ये काम करत आहे. बहुदा या रेस्तराँच्या मेन्यूमध्ये अननस नसावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT