FDA Food Safety Action: सणासुदीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ९ कोटींचा ३.५३ लाख किलो अन्नसाठा जप्त

१० आस्थापनांचे परवाने निलंबित
FDA Action
FDA Actionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. या मोहिमेत सात विभागांतील ११४ आस्थापनांची तपासणी करून सुमारे ३ लाख ५३ हजार किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत ९ कोटी १ लाख रुपये आहे. दहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

या कारवाईत कोकण विभागात सर्वाधिक साठा जप्त करण्यात आला. भिवंडी येथील अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या गोदामातून विविध ब्रँडचे तब्बल १ लाख ४४ हजार २१८ किलो खाद्यतेल ताब्यात घेण्यात आले.

FDA Action
Maritime Development: मेरिटाईम क्षेत्रात महाराष्ट्र देशातील सर्वाधिक गुंतवणूकदारस्नेही राज्य- मंत्री नितेश राणे

या कारवाईमुळे राज्यातील एकूण जप्त साठ्यात भिवंडीतील कारवाईचा मोठा वाटा आहे. या कारवाईत कोकण विभागात सर्वाधिक साठा जप्त करण्यात आला. भिवंडी येथील अव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडच्या गोदामातून विविध ब्रँडचे तब्बल १ लाख ४४ हजार २१८ किलो खाद्यतेल ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे जप्त साठ्यात भिवंडीतील कारवाईचा वाटा आहे.

कोकण विभागात २२ आस्थापनांची तपासणी करून १ लाख ६७ हजार ४९४ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत ५ कोटी २७ लाख रुपये आहे. या विभागातील दोन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

नवी मुंबईतील महापे, तुर्भे आणि वाशी परिसरातही मसाले, हिंग पावडर, खाद्यतेल, आंब्याचा गर, चारोळी, चिया बिया आणि सुकामेवा यांचा साठा जप्त करण्यात आला.

FDA Action
Diwali firecrackers: पर्यावरणपूरक फटाक्यांना यंदा मुंबईकरांची पसंती; हिरव्या रंगाच्या फटाक्यांना ५० टक्के मागणी

पुणे विभागात २९ आस्थापनांची तपासणी करून ६६ हजार ७०९ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत १ कोटी ४७ लाख रुपये आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात २२ आस्थापनांवर कारवाई करून ३३ हजार ६७९ किलो साठा जप्त करण्यात आला.

अमरावती विभागात सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.