TRAI new rules for SMS 2025: दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढतच असून सायबर गुन्हेगार हे एकापेक्षा एक खतरनाक अन् वैविध्यपूर्ण क्लुप्त्या वापरत आहेत. सध्या हे गुन्हेगार फेक SMS पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळं भारतीय दूरसंचार नियामक मंडळ (TRAI) ने एक पोस्ट करत खरा SMS कसा ओळखायचा हे उदाहरण देऊन स्पष्ट केलं आहे.
ट्रायने (TRAI) आपल्या एक्सवर पोस्ट करत सांगितलं की तुम्हाला येणारे सगळे SMS हे खरे नसतात. कोणीही अधिकृत वाटावा असा SMS तुम्हाला पाठवू शकतो. मात्र तुम्हाला आलेला SMS हा खरा आहे की खोटा हे ओळखण्यासाठी काही ट्रिक्स आहेत. खरा SMS ओळखता यावा यासाठी Suffixes वापरण्यात येतात.
TRAI ने आपल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की SMS सेंड करणाऱ्या हेडर्सच्या शेवटी जर -P, -S, -T, किंवा -G असे शब्द डॅश देऊन जोडलेले असतील तर तो SMS खरा आहे. यात TRAI ने या प्रत्येक लेटरचा काय अर्थ होतो हे देखील सांगितलं आहे. -P हा प्रमोशनल, -S हा सर्व्हिस, -T हा ट्रांजॅक्शनल आणि -G हे लेटर गव्हर्मेंट रिप्रेझेट करतो.
सायबर गुन्हेगार असे पाठवतात SMS
सायबर गुन्हेगार हे लोकांची आर्थिक लूट करण्यासाठी फेक SMS पाठवत असतात. याच इमर्जन्सी आहे, रिवॉर्ड्स पॉईंट आजचं संपत आहेत, तुमच्या कार्डवर पाठवले आहेत, तुमच्या अकाऊंटला लॉटरी लागली आहे. अशा प्रकारची प्रलोभने किंवा भीती दाखवली जाते.
आजच तुमची KYC अपडेट करा नाहीतर बँक अकाऊंट होईल बंद
तुमम्हाला १० लाखाची लॉटरी लागली आहे.
SMS मध्ये वेगळ्याच URL ची लिंक असते. ती तुम्हाला फेक पोर्टलवर घेऊन जाते.
तुमच्याकडून बँक डिटेल्स, OTP, कार्डचा CVV नंबर मागितला जातो.
फ्रॉड करणाऱ्या SMS मध्ये ग्राहकांना कॉल, मेसेज करून लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. तुम्ही एकदा क्लिक केलं की हळू हळू तुम्ही या गुन्हेगारांच्या जाळ्यात फसत जाता. ते तुमचा OTP देखील टाकण्यास सांगतात. जाणकार आणि बँक ग्राहकांना सल्ला देतात की तुम्ही अनोळखी व्यक्तींना किंवा प्लॅटफॉर्मवर तुमचे बँकिंग पासवर्ड शेअर करू नका अशी सुचना वेळोवेळी देत असतात.
सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी तुम्हाला खरा SMS कोणता अन् नकली SMS कोणता हे ओळखता येणं गरजेचं आहे. त्यासाठीच TRAI ने आपल्या एक्स अकाऊंटवरून खरा SMS कसा ओळखायचा हे सांगितलं आहे.