गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका तृतीया असते. महादेवांसारखा सुयोग्य आणि प्रेमळ पती मिळवा यासाठी या दिवशी पूजा आणि उपवास केला जातो. महाराष्ट्रात हा दिवस हरतालिका तृतीया म्हणून ओळखला जातो तर उत्तरेत हा दिवस हरियाली तीज म्हणून साजरा केला जातो. कुमारिका उत्तम पतीसाठी तर सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात.
यंदा 26 ऑगस्टला हरतालिका व्रत साजरे केले जाणार आहे. यावेळी पूजेसाठी जे काही साहित्य लागेल याची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत.
वाळू
सुपारी
हळदी कुंकू
अक्षता
विडयाची पाने
ओटीचे साहित्य (ब्लाऊजपीस, बांगड्या)
पाणी
दूध
गूळ खोबरे
दिवा
कापसाचे वस्त्र (महादेवांसाठी वेगळे, पार्वतीसाठी वेगळे)
दूर्वा, पाने
11 किंवा 5 प्रकारची पाने
फुले
5 फळे
माता पार्वती आणि सखीची मूर्ती
सर्वप्रथम वाळू धुवून घ्यावी.
त्यानंतर स्वच्छ पाट घेऊन त्याभोवती रांगोळी काढावी.
यानंतर वाळू घेऊन महादेवांची पिंड बनवावी.
त्यासमोर उभ्या आकारात नंदी काढावा.
गणपती म्हणून सुपारी ठेवाव्या.
त्याशेजारी माता पार्वती आणि सखीची मूर्ती ठेवायची आहे.
या शिवलिंगाभोवती कापसाचे वस्त्र घालावे.
त्यावर पांढरी फुले वाहावीत.
सर्वप्रथम दिवा लावून घ्या.
त्यानंतर गणपतीचे प्रतीक असलेल्या सुपारीची पूजा करून घ्या.
हळद- कुंकू, फुले वाहावी.
गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
यानंतर महादेवांची पूजा करावी.
महादेवांची पूजा करताना फार पाणी वापरू नये .
यासोबत नंदी, पार्वती आणि सखीची पूजा करावी.
पार्वती मातेला कापसाचे वस्त्र वहावे.
हळदी कुंकू, फुले वाहावीत.
यासमोर विडयाची पाने ठेवायची आहेत.
त्यावर ओटीचे साहित्य आणि फुले वाहावीत.
पाने आणि फुले यांचा जुडगा करावा.
तो शिवलिंगावर वहावा.
त्याला हळदी कुंकू वाहावीत.
नैवेद्य दाखवायचा आहे.
बाजूला 5 फळे ठेवावीत.
यानंतर हरतालिकेची कथा वाचावी.
महादेवांची आरती करावी.