

गणपती बाप्पाचे आगमन आता काहीच दिवसांवर आले आहे. प्रत्येकाच्या घरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. या दहा दिवसात अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा येतात. याचे फोटो अनेक कलाकार चाहत्यांशी शेयर करतात. बॉलीवुडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन जल्लोषात होत असते. स्वत: शिल्पा बाप्पाला घरात उचलून आणत असते. पण नुकतीच शिल्पाने एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात तिने यावर्षी गपणती आणणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Bollywood News)
शिल्पाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे सांगितले आहे. ती म्हणते, ‘डियर फ्रेंडस, मला सांगताना अत्यंत दुख होत आहे की कुटुंबात निधन झाल्याने यावर्षी आम्ही गणपती उत्सव साजरा करणार नाही आहोत. परंपरेनुसार आम्ही 13 दिवस शोक पाळत असल्याने कोणत्याही धार्मिक उत्सवात सहभागी होऊ शकत नाही. आम्ही तुमच्याकडून सहानुभूति आणि प्रार्थनांची अपेक्षा करत आहोत. कुंद्रा परिवार.’
राज कुंद्रा याच्या कुटुंबात झालेल्या निधानानंतर तिने ही पोस्ट केली आहे. शिल्पा आणि पती राज कुंद्राने अलीकडेच पंजाबी सिनेमातून मेनस्ट्रीम सिनेमात पाऊल ठेवले आहे. ‘ मेहेर' असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. यानिमित्ताने शिल्पा आणि राजने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांची भेट घेतली आहे.
याशिवाय शिल्पा आणि राजने सुप्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांचीही भेट घेतली होती. यावेळी किडनी विकाराने ग्रस्त असलेल्या प्रेमानंद महाराजांना राजने एक किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
अभिनेता मनीष पॉल यानेही गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पोस्ट शेयर केली आहे. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, माझ्या आई- वडिलांची तब्येत अतिशय नाजुक असल्याने यावेळी मी अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहे.