Engineering Jobs pudhari
एज्युदिशा

Engineering Jobs: इंजिनिअर झाला नोकरीची गॅरेंटी... गेले ते दिवस! स्टार्टअप फाऊंडरच्या पोस्टनं भूकंप; उपायही सांगितलाय

Anirudha Sankpal

Engineering Jobs: प्रसिद्ध स्टार्टअप फाऊंडर श्वेता यांची एक्सवरील एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये श्वेता यांनी दावा केला आहे की भारतात आधी इंजिनिअरिंग झालं की नोकरी पक्की असा एक फॉर्म्युला होता. मात्र हा फॉर्म्युला २०२० मध्येच मरून गेला आहे. या संपूर्ण संकटासाठी श्वेता यांनी तीन मोठे गुन्हेगार असल्याचं सांगितलं.

श्वेता यांनी देशातील इंजिनिअरिंग कॉलेजवर याचा ठपका ठेवला आहे. त्यांनी हे सर्व कॉलेज विद्यार्थ्यांकडून २०२६ ची फी घेत आहेत. इंजिनिअरिंगसाठी जवळपास १२ लाख रुपये खर्च येतोय. मात्र ते त्यांना २०१५ चाच सिलेबस शिकवत आहेत. त्यामुळं जवळपास १० वर्षापूर्वीच्या स्टाईलनं जी कन्सेप्ट विद्यार्थी शिकण्यासाठी ४ वर्षे वाया घालवत आहेत त्या कन्सेप्ट चॅट जीपीटी सारखे AI टुल्स हे काही संकेदातच स्वतः जनरेट आणि ऑटोमेट करू शकतात.

आई-वडील देखील दोषी

श्वेता यांनी फक्त कॉलेजलाच जबाबदार धरलं नाही तर आई-वडील आणि विद्यार्थ्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पालक आज देखील जुन्या धारणा कवटाळून बसल्या आहेत. मुलाला कॉम्प्युटर सायन्सला टाकलं म्हणजे मुलगा थेट अमेरिकेत जाईल. लाखोंचे पॅकेज घेऊन. यामध्ये त्यांनी विचार न करता मोठं कर्ज काढून मुलांना इंजिनिअरिंगला घातलं. मात्र कोरोनानंतर AI बूम झालं अन् नोकऱ्यांचा संपूर्ण ट्रेंडच बदलला.

विद्यार्थी कसे दोषी?

श्वेता यांनी विद्यार्थ्यांना देखील एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांनी देखील मेंढराच्या रांगेप्रमाणं वागणं बंद करायला हवं. त्यांना हे कळत नाहीये की सुरूवातीच्या ३.५ लाख रूपयांच्या वार्षिक पॅकेजसाठी ते चार वर्षे आणि लाखो रूपये गुंतवत आहेत. गेल्या १० वर्षात इंजिनिअरिंगचे सुरूवातीचे पॅकेज हे जरा सुद्धा बदललेलं नाही.

श्वेता यांच्या मते मार्केट बदललं आहे. AI देखील अपग्रेड होत आहे. नोकरी लागण्याची पद्धत बदलत आहे. मात्र तुमची मानसिकता बदलत नाहीये. आता तरी जागे वाहा.

या संकटातून वाचण्यासाठी श्वेता यांनी फक्त इंजिनिअरिंगचे दोष दाखवले नाही तर त्यांनी या AI च्या या जमान्यात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांना एक प्रॅक्टिकल रोडमॅप देखील दाखवला आहे.

असा आहे चार वर्षाचा प्लॅन

पहिले वर्ष

पहिल्या वर्षी कोडिंगचे बेसिक फंडामेंटल्स स्ट्राँग करा. कमीत कमी एका भाषेवर प्रभुत्व मिळवा आणि प्लेसमेंट सीजनची वाट न पाहता पहिल्या वर्षापासूनच गिटहब प्रोफाईल तयार करण्यास सुरूवात करा.

दुसरे वर्ष

दुसऱ्या वर्षी फक्त ऑनलाईन ट्युटोरियल्स पाहून प्रोजेक्ट कॉपी करण्यापेक्षा स्वतःचे प्रॅक्टिल प्रोजेक्ट तयार करे. गरज लागलीच तर स्टार्टअप्समध्ये बिन पगारी इंटर्नशिप करण्यासाठी देखील तयार रहा.

तिसरे वर्ष

तिसऱ्या वर्षी कोणत्या तरी एका फिल्डमध्ये स्पेशलाईजेशन निवडा जसे की आर्टिफिशल इंटेलिजन्स, क्लाऊड कंप्युटिंग, सायबर सिक्युरिटी किंवा एम्बेडेड सिस्टम्स या सारख्या स्पेशलाईज्ड फिल्डची निवड करा. अशी इंटर्नशिप निवडा जी पुढे जाऊन प्री प्लेसमेंट ऑफरमध्ये रूपांतरित होऊ शकेल.

चौथे वर्ष

चौथ्या वर्षात फक्त कॉलेज कॅम्पसच्या प्लेसमेंटवर बसू नका. ऑफ कॅम्पस जॉब्ससाठी देखील अॅक्टिव्ह रहा. आपला पोर्टफोलिओ मजबूत करा आणि जॉब व्हेकन्सी आली की त्वरित अर्ज करायला शिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT