फीचर्स

Covid Impact : कोरोनामुळे मुंबापुरीतील वेश्यांचे उपनगरांमध्ये स्थलांतर

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : सुमन (नाव बदलेलं आहे) नालासोपारा येथून सेंट्रल रेल्वे स्टेशनला गाठण्यासाठी लोकलने निघते. तासाभराचा प्रवास केल्यानंतर ती स्टेशनला पोहोचते. तेथून कामाठीपुरा गाठण्यासाठी थोडे अंतर चालते. याच कामाठीपुऱ्यात तिने आपलं आयुष्य काढलं आहे. पण आज ती दररोज नालासोपऱ्यावरून कामाठीपुऱ्याला तासाभराचं अंतर कापून येते. कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे (Corona Impact) कामाठीपुरा सोनमला सोडावं लागलं. कारण, तिथलं राहण्याचं भाडं तिला परवडत नव्हतं. कामाठीपुराच्या तुलनेत नालासोपऱ्यात घरभाडं स्वस्त पडतं. त्यामुळे तिकडे राहायला जाण्यासाठी पर्यायच नव्हता. आता ती जुन्या एखाद्या क्लायंटला भेटायचं असेल तरच ती नालासोपाऱ्याहून मुंबईला येते.

रेड-लाईट परिसरातील महिलांसाठी काम करणाऱ्या 'प्रेरणा' नामक एनजीओने यावर अभ्यास केला. त्यांच्या मतानुसार २०१९ च्या तुलनेत म्हणजेच कोरोनापूर्वीच्या तुलनेत कोरोनाकाळात किंवा त्यानंतर वेश्यागृहांची संख्या कमालीची कमी झालेली आहे. कोरोनामुळे येथील वेश्यागृहे चालवणारे आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उपनगरामध्ये स्थलांतरीत झाले आहेत.

प्रेरणा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून असं आढळून आलं आहे की, कमाठीपुरा वेश्यागृहांचा विचार केला तर येथील वेश्यागृहे २०१९ मध्ये ४४७ वरून ४३३ कमी झालेली आहे. कोरोनापूर्वी कामाठीपुरा वेश्यागृहांची संख्या जास्त होती. तिथं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्यांना भेटायला येणाऱ्या क्लायंटची संख्याही खूप होता. पण, आता या वेश्यागृहांचा वापर अतिथीगृह म्हणून केला जात आहे.

फाॅकलॅंड रोडवर असणाऱ्या वेश्यागृहांचा विचार केला की, तिथं वेश्यागृहांची संख्या ही ३८२ वरून ३७९ पर्यंत आली आहे. त्याठिकाणी आता नवनवीन दुकानं उभी राहत आहेत. साड्यांची दुकानं, चहाचे स्टाॅल्स, मेटल वर्क युनिट, अशी नवी दुकाने उभी राहिलेली आहेत. तिथं सेक्स वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा लाॅकडाऊन सुरू झालं, तेव्हा भाज्या विकण्याचं काम सुरू केलं.

परिणामी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या बहुसंख्य महिलांनी कोरोना आणि लाॅकडाऊनच्या (Corona Impact) काळात जीवनावश्यक वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पण, त्या पूर्वी वेश्या व्यवसाय करत असल्यामुळे फारसं यश मिळू शकलं नाही. प्रेरणा संस्थेच्या पदाधिकारी सांगतात की, "लाॅकडाऊन काळात अनेक एनजीओजकडून मदत मिळू शकल्यामुळे या महिलांना थोडाफार आधार मिळाला."

वाशी-तुर्भे परिसरातील वेश्यागृहांची संख्या ही २३३ वरून २१६ वर आलेली आहे. आता त्या वेश्यागृहांमध्ये स्वयंसेवी संस्थांची कार्यालयं कार्यरत आहेत. वसई, नालासोपारा, सायन, एटाॅंप हिल, कळवा या उपनगरांच्या परिसरात वेश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांचं स्थलांतर झाल्यामुळे आता ते हाॅटस्पाॅट होत असल्याचं निदर्षणास आलेलं आहे. इतकंच नाही तर रायगड आणि ठाणेदेखील वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचं नवी केंद्रं बनत चालली आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणसांची जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे अगोदरच रेड-लाईट एरियाज कमी होत होती. त्यात कोरोनासारख्या महामारीने आणखी भर पडली. कामाठीपुरा, फाॅकलॅंड रोड ही ठिकाणं मोक्याची आहेत.

या ठिकाणांचं नुतनीकरण किंवा पुनर्विकास झाला की, येथील मालक वेश्य व्यवसाय करणाऱ्या लोकांना ही ठिकाणं भाड्यानं देण्याच्या मानसिकतेत नाहीत. तसंही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वेश्य व्यवसाय करणाऱ्या महिला मॅसेजिंग एप्सचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे रेड-लाईट एरियामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरजच उरली नाही.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरच्या कस्तुरी सावेकरने सर केले मनस्लू शिखर..

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT