भूमिपुत्र

ज्वाला मिरची चा जलवा! वीरा अ‍ॅग्रो प्रॉडक्टच्या वापरातून 50 टन उत्पादन!

सोनाली जाधव

प्रवीण गायकवाड : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील चिंचणी गावच्या एका शेतकर्‍याने ज्वाला मिरचीच्या शेतीत अभूतपूर्व उत्पादन काढून जणू आपल्या कष्टाचा 'जलवा' दाखवून दिला आहे. दीड एकरात 8 महिन्यात 38 टन इतके विक्रमी उत्पादन घेत अजूनही दोन महिने प्लॉट टिकवून 50 टनाचे टार्गेट पूर्ण करणार, असा दुर्दम्य आत्मविश्वास बोलून दाखवला चिंचणीच्या शेतकरी पिता-पुत्र गणेश गवळी व अक्षय गवळी यांनी. वीरा अ‍ॅग्रोची औषधे व सल्ला मदतीला घेऊन मिळविलेल्या या यशात वीरा अ‍ॅग्रो, वृषाल पाटील व पृथ्वीराज हजारे यांचा मोठा वाटा असल्याचे ते आवर्जून सांगतात.

8 महिन्यांपासून तोड सुरूच : अभ्यास आणि अनुभवाचा संगम

मे महिन्यात लागवड करण्याचा मानस असताना जुलै महिन्यात मिरची लागवड करणार्‍या शेतकर्‍यांच्यासोबत वीरा अ‍ॅग्रोचे पृथ्वीराज हजारे यांच्यासोबत चर्चा करीत जुलैमध्ये दीड एकरात लावण केली. आज अखेर 10 तोडे मिरचीचे झाले असून 8 महिने प्लॉटला पूर्ण झाले आहेत. बीन्स शेंगेसारखी असणारी ही मिरची चवीला तिखट नाही. थ्री स्टार व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
लावण केल्यानंतर 40 व्या दिवशी मिरची लागायला सुरुवात होते व 65 व्या दिवशी पहिला तोडा सुरू झाला. 10 एकर द्राक्षबाग असणारे जुने जाणते द्राक्ष बागायतदार असणार्‍या गवळी यांनी पहिल्यांदा या मिरचीचा हा प्रयोग केला आहे. वडील गणेश गवळी यांचा अभ्यास, पिता-पुत्राचे कष्ट, वीरा अ‍ॅग्रोचे प्रोडक्ट आणि कन्सल्टिंग यांचा एकत्रित परिणाम म्हणून जिथे अभ्यास, अनुभव व कष्ट यांचा त्रिवेणी संगम झाला आणि अभूतपूर्व यशात त्याचे रुपांतर झाले.

400 किलो प्रतिदिन माल

ज्वाला मिरचीला आठ महिन्यात कमीत कमी 13 रुपये तर जास्तीत जास्त 85 रु. किलो व सरासरी 50 ते 55 रुपये दर मिळाल्याचे गवळी यांनी सांगितले. मिरची तोड सुरू असताना पिकाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत तोड जाईपर्यंत 10 दिवसात नवीन मिरची तयार व्हायची. त्यामुळे ऐन हंगामात दररोज 25 बायका मजुरीस असायच्या तर आठव्या महिन्यातसुद्धा त्या मजूर स्त्रिया सलग एकाच प्लॉटमध्ये काम करीत आहेत हे विशेष! आजही 400 किलो प्रतिदिन माल तुटत असून एके दिवशी सर्वाधिक 1400 किलो मिरची तुटली आहे.

गवळी यांनी तोडा व तारीखनिहाय उत्पादनाची ऑनलाईन ठेवलेली नोंद.

आजवर मिळालेल्या यशात वीरा अ‍ॅग्रोचे व्ही लाईम, आय बी सुपर यांसह अनेक औषधे उपयोगी ठरली आहेत. त्यामुळेच पाऊण फूटपर्यंत मिरची लांब झाली होती तर झाडे डाळिंबसारखी 6 फुटापर्यंत वाढली आहेत. मजूर स्त्रियांना झाडांच्या उंचीमुळे उनही लागत नाही इतका प्लॉट दमदार झाला आहे. वीरा अ‍ॅग्रोचे पृथ्वीराज हजारे हे आठवड्यात दोनवेळा न चुकता भेट देतात आणि मार्गदर्शन करतात, असेही गवळी म्हणाले. द्राक्षे एक्स्पोर्ट करणार्‍या या बड्या शेतकरी पिता-पुत्रांनी ट्रॅक्टरने औषध फवारणी सुरू ठेवली आणि आता 50 टनाचे टार्गेट पूर्ण करतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे या ज्वाला मिरचीने द्राक्षांना केंव्हाच मागे टाकले आहे. म्हणूनच गवळी आता पुन्हा नवीन प्लॉटची तयारी करीत आहेत.
(संपर्क – अक्षय गवळी, शेतकरी : 9370511567)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT