axis bank mobile number change online
देशातील प्रुमख खासगी बँक एक्सिस बँकेने आपल्या मोबाईल बँकिंग अॅपवर आधार फेस ऑथेंटिकेशन सुरू केलं आहे. याद्वारे तुम्ही बँक खात्याला अटॅच असलेला रजिस्टर मोबाईल नंबर अपडेट करू शकता. अशी सुविधा देणारी एक्सिस बँक ही देशातील मोठ्या बँकांपैकी पहिली बँक बनली आहे. अॅक्सिस बँकेने युआयडीएआयच्या ही फेस ऑथेंटिकेशन सेवा पूर्णपणे डिजीटल आणि स्वतःची स्वतः करता येणारी केली आहे.
आता अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना कधीही आणि कुठूनही आपला मोबाईल नंबर डिजीटली अपडेट करता येणार आहे. ही सेवा तीन सोप्या टप्प्यात आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने करता येते. यासाठी आता ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही.
ग्राहक तीन स्टेप्समध्ये ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी आधी प्ले स्टोअरवरून AadhaarFaceRD हे अॅप डाऊनलोड करा. अॅक्सिस बँकेच्या अॅपमध्ये जाऊन मोबाईल अपडेट ऑप्शन सिलेक्ट करा.
पहिली स्टेप- नवा मोबाईल नंबर यात टाका.
दुसरी स्टेप - आधार फेस ऑथेंटिकेशनद्वारे आपली ओळख सत्यापित करता, फ्रंट कॅमेऱ्याने आपला एक लाईव्ह फोटो काढा.
तिसरी स्टेप - नव्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो फीड करा.
आधार फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान हे ग्राहकाचा लाईव्ह फोटो आधार डेटाबेसमध्ये असलेल्या फोटोशी जुळवून पाहते. ओळख पटल्यानंतर सुरक्षेसाठी बँकेकडून अजून एक सुरक्षेचे पाऊल उचलले जाते. एकदा का तुमचा मोबाईल नंबर अपडेट झाला की ग्राहकाला तो मोबाईल नंबर मोबाईल अॅफ ओपनवर पुन्हा रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर पहिले २४ तास मोबाईल बँकिंग ट्रांजॅक्शन ऑटोमेटिक स्वरूपात डिफॉल्टवर रिसेट केलं जातं. अॅक्सिस बँकेने डिजीटल फर्स्ट अंतर्गत भविष्यासाठी एक मोठं स्ट्रेटेजिक पाऊल टाकलं आहे.