Mandanna Vijay Deverakonda Wedding Numerology: भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध कलाकारांनी २६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी उदयपूरमधील एका शाही पॅलेसमध्ये लग्न केलं. जरी हे लग्न राजस्थानमध्ये झालं असलं तरी या दोघांनी तेलुगू परंपरेनुसार आणि कोडवा परंपरेनुसार लग्नाचे विधी पार पाडले. या दोघांचा लग्नाचा मुहूर्त देखील खास होता. रश्मिका आणि विजयने सकाळी १० वाजून १० मिनिटांनी लग्न केलं असून न्युमरॉलॉजीच्या दृष्टीकोणातून हा विवाह मुहूर्त खूप खास असल्याचं बोललं जात आहे.
विशेष म्हणजे हीच वेळ अनेक घड्याळ्यांच्या शोरूममध्ये डिस्प्ले केली जाते. तुम्ही कोणत्याही घड्याळाची जाहिरात पाहिली तर त्यात १० वाजून १० मिनिटांचीच वेळ दर्शवली असते. अनेक घड्याळांमध्ये ही वेळी बाय डिफॉल्ट सेट केलेली असते.
घड्याळाचा छोटा काटा हा १० वर तर मोठा काटा हा २ वर ठेवण्यात आलेला असतो. ही स्थिती १० वाजून १० मिनिटे ही वेळ दर्शवते. हा फक्त योगायोग नसून त्यापाठीमागे एक कास कारण आहे. ज्यातिष शास्त्रानुसार १० : १० नंबरचे एक वेगळे महत्व आहे.
न्युमरॉलॉजीनुसार अशी मान्यता आहे की १०१० हा पॅटर्न आयुष्यात आनंद, उज्वल भविष्य आणि सुख समृद्धी आणते. सकाळी १० ते १०:२० यादरम्यानचा वेळ हा Lecabel नावाच्या एंजलशी संबंधित असल्याचं मानलं जातं. ही एंजल यश, सुरक्षा आणि नवीन कामांमध्ये शुभ प्रतीम मानली गेली आहे.
न्युमरॉलीजी नुसार १०१० हा एंजल नंबर देखील आहे. यात आनंद, पवित्रता आणि खरं प्रेम याचा संकेत देखील मानले गेले आहे. नात्यात १०१० हा नंबर असणं नव्या नात्यांसाठी आणि नात्याची नवी सुरूवात याचं प्रतिक असतं. काही न्युमरॉलॉजिस्टनुसार १०१० एक खास मेसेज आहे. हा मेसेज ब्रम्हांडाकडून मिळतो हा नंबर योग्य दिशेने पुढा जात आहात असा संकेत देखील देतो.
न्युमरॉलॉजीनुसार १०१० खऱ्या प्रेमाशी देखील संबंधित आहे. प्रेमाच्या बाबतीत १०१० अंक दिसणे म्हणजे नवं नातं हे खोल, आधीपेक्षा मजबूत असणार असा संकेत देते. आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीकोणातून देखील हे अंक प्रगती आणि वृद्धीकडे इशारा करतात. हा संकेत लवकरच नव्या संधी चालून येणार आहेत असं देखील दर्शवते.
१०१० चा अर्थ १ आणि ० दोन्ही अंकाशी जोडला गेला आहे. १ म्हणजे सुरूवात, स्वयमपूर्ण आणि स्वतःचे जग स्वतः तयार करण्याची क्षमता. तर ० हा अंक आध्यात्मिक समज, ज्ञान, नव्या संधी याचे प्रतिक आहे. दोन्ही अंक मिळून नवे विचार, काम आणि स्वप्ने यांच्यातील समोतल तयार करणे असा संदेश मिळतो.