

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या संगीत सोहळ्यातील रॉयल लूक आणि रोमँटिक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रश्मिकाच्या चमचमत्या लेहेंग्याने आणि दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली असून पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Rashmika -Vijay Music Ceremony video viral
दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा. गीतागोविंदम (Geetha Govindam) आणि Dear Comrade (डिअर कॉम्रेड) या चित्रपटांमधील त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही जोडी चाहत्यांची आवडती ठरली. आता पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आले आहेत, कारण त्यांचा संगीत सोहळ्यातील लूक आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खास संगीत कार्यक्रमात रश्मिका आणि विजय एकत्र दिसले. या सोहळ्यात चमचमता लेहेंगा आणि केपमध्ये दोघांचा रॉयल अंदाज दिसला. जणू प्रिन्स-प्रिन्सेस. एलिगंट अंदाज पाहून फॅन्सनी देखील या लव्हबर्डवर प्रेमाचा वर्षाव केला. हलक्या दागिन्यांसोबत तिने ग्लोईंग मेकअप केला होता, ज्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं.
विजय देवरकोंडानेही दमदार एंट्री घेतली. त्याचा रॉयल आणि स्टायलिश अंदाजही तितकाच आकर्षक होता. कार्यक्रमादरम्यान दोघांनी गाण्यावर डान्स केला. सोबतच रश्मिकाचा दीर आणि विजयचा भाऊ आनंद यानेही ताल धरला.
शुक्रवारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. आता, रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत संगीताचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या पोटोंमध्ये संगीत सोहळा धमाकेदार झाल्याचं पाहायला मिळतंय.
मंगळवारी, रश्मिकाने संगीत समारंभातील फोटो अल्बम इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. संध्याकाळच्या सुंदर वातावरणात स्टेजवरील परफॉर्मन्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. विजयने क्लासिक काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये सुंदर डान्स सादर केला. सोबतच एक GIF शेअर केलं आहे, ज्यामध्ये विजय रश्मिका डान्स करताना दिसताहेत. रश्मिकाचा दीर आणि विजयचा भाऊ आनंद देवरकोंडाने देखील स्टेजवर डान्स केला.
तिने हे फोटो, व्हिडिओ शेअर करताना लिहिले- ''प्रेमाने भरलेली ती रात्र, आनंदाचे अश्रू, हास्य, संगीत, गाणे, चमक आणि आम्ही रात्रभर नाचत होतो. ती खरोखरच आतापर्यंतची सर्वात मजेदार रात्र होती!!...आमच्या कुटुंबांना इतके मुक्तपणे आणि इतके चांगले नाचताना पाहून पूर्णपणे उत्साहित आणि आश्चर्यचकित होण्यापर्यंत! २४.२.२६! विजय आणि मी आमच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या प्रेमाने वेढलेलो..आम्ही नाचलो!''
रश्मिका आणि विजय यांनी २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थित लग्न केले. आता या कपलचे ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन असणार आहे.